आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमपोटाच्या महाधमनीची अँजिओप्लास्टी - केस स्टडी

पोटाच्या महाधमनीची अँजिओप्लास्टी - केस स्टडी

केस 01

एका 77 वर्षांच्या महिलेला आराम करताना दोन्ही हातापायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या दोन्ही फेमॉरल रोहिणीचे स्पंदन होत नव्हते. कलर डॉपलर अल्ट्रासाउंड अभ्यासामध्ये मूत्रपिंडाच्या ओटीपोटातील खालच्या महाधमनीचा गंभीर स्टेनोसिस आढळला. लोकल अॅनेस्थेशिया देऊन, उजव्या सुपरफिशिअल फेमोरल रोहिणीमध्ये मार्ग तयार करून स्टेनोसिसच्या आरपार एक मार्गदर्शक वायर बसवली गेली. लेझन विस्फारण्यासाठी एक मोठा फुगा वापरला गेला. प्रक्रियेच्या शेवटी, जिथे रोहिणी अरूंद झाली होती तिथे 10% स्टेनोसिस राहिला होता. संपूर्ण प्रक्रियेला 20 मिनिटे लागली. रुग्णाच्या दोन्ही पायांच्या सर्व नाड्यांचे स्पंदन त्वरित पूर्ववत झाले. 48 तासांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडले गेले.

केस 02

एक 48 वर्षीय वनरक्षक, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करत असे, त्याला चालताना नितंबांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. दोन्हीही फेमोरल रोहिण्यांचे स्पंदन जाणवत नव्हते. पोटाच्या महाधमनीचे जिथे विभाजन होते त्याच्या अगदी अलीकडे गंभीर स्टेनोसिस होता. लेझन बलूनने विस्फारला गेला आणि एक मोठा पाल्मझ स्टेंट बसवला गेला, अँजिओप्लास्टीनंतर याचे उत्तम निकाल मिळाले. एक आठवड्यानंतर रुग्णाच्या सामान्य हालचाली सुरू झाल्या.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स