आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमकॅरोटिड अँजिओप्लास्टी

कॅरोटिड अँजिओप्लास्टी

स्ट्रोक म्हणजे ब्रेन अटॅक असतो. स्ट्रोकमुळे एक हात किंवा पाय किंवा शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू होतो; कर्करोग आणि ह्रदय विकारानंतर ते मृत्यूचे तिसरे मोठे कारण आहे.
पुढील गोष्टींमुळे स्ट्रोक होतो
1) ) ब्रेन हॅमरेज: रक्तवाहिनी फुटल्यामुळे मेंदूच्या उतींमध्ये रक्तस्त्राव होणे.
2) एम्बोलिझम: गुठळी होण्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे.

मानेच्या दोन्ही बाजूला एक अशा असलेल्या कॅरोटिड आणि मज्जारज्जूच्या रोहिण्या मेंदूला रक्तपुरवठा करतात. कॅरोटिड रोहिण्यांच्या भिंतींमधील लिपिड साहित्य फुटून ते मेंदूकडे जाऊ शकते ज्यामुळे स्ट्रोक होतो. पॅरालिसिस होणाऱ्या 20% रुग्णांना प्रत्यक्षात त्यांच्या कॅरोटिड रोहिणीचा स्टेनोसिस असतो. त्यामुळे स्ट्रोकच्या सर्व प्रकरणांमध्ये, कॅरोटिड रोहिण्यांची तपासणी करणे आवश्यक असते.

कॅरोटिड रोहिणी मज्जारज्जूची रोहिणी अरुंद होण्याची लक्षणे काय आहेत?

1) एका बाजूला तात्पुरती कमजोरी येणे.
2) हात किंवा पाय किंवा चेहऱ्यावर एका बाजूला तात्पुरता बधीरपणा येणे.
3) बोलणे अस्पष्ट होते.
4) तात्पुरती दृष्टी जाणे.
5) तोल जाणे.
6) अचानक गरगरल्यासारखे वाटणे / डोळ्यांसमोर अंधारी येणे.

कॅरोटिड रोहिणी अरुंद झाल्याचे निदान कसे होते?

1)लक्षणांचा तपशीलवार इतिहास.
2) मानेतील कॅरोटिड रोहिणीचे स्पंदन चाचपडून पाहणे.
3) कॅरोटिड रोहिणीचा कलर डॉपलर रोहिणीचा डॉपलर अभ्यास (सोनोग्राफी), ज्यामध्ये अरूंद होण्याची व्याप्ती आणि तीव्रता दिसून येईल.

कॅरोटिड रोहिणी अरूंद होणे किती धोकादायक आहे?

कोणतीही लक्षणे नसलेल्या, परंतु 75% अरुंद झालेल्या रुग्णांमध्ये पहिल्या वर्षात स्ट्रोक होण्याचा 2 ते 5% प्रादुर्भाव आहे. लक्षणात्मक रुग्णांमध्ये 75% हून जास्त अरूंद झालेले असताना पहिल्या वर्षात स्ट्रोकची शक्यता 12% ते 13% असते.

कॅरोटिड अँजिओप्लास्टी:

गेल्या काही वर्षांमध्ये, कॅरोटिड रोहिणी अरुंद आणि बंद होण्याच्या उपचारांमध्ये क्रांती घडली आहे. शस्त्रक्रियेविना रोहिणी उघडण्याचे तंत्र म्हणजे अडथळा निर्माण झालेले जवळ जवळ सर्व रुग्ण या तंत्रासाठी अनुरूप असतात. रिस्टेनोसिसला प्रतिबंध करण्यासाठी कॅरोटिड रोहिणीमध्ये एक स्टेंट बसवला जातो. पुढील बाबतीत कॅरोटिड अँजिओप्लास्टी केली पाहिजे:
1) लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये >75% स्टेनोसिस.
2) लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये >60% स्टेनोसिस.

शस्त्रक्रियेऐवजी कॅरोटिड रोहिणीची अँजिओप्लास्टी करण्याचे फायदे:

1)ही प्रक्रिया लोकल अॅनेस्थेशियाखाली केली जाते. त्यामुळे वृद्ध रुग्णांमध्ये तसेच ज्या रुग्णांना जनरल अॅनेस्थेशियाची जोखिम असते, जसे की फुफ्फुसाचा आजार, यकृताचा आजार आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांमध्ये ही प्रक्रिया केली जाऊ शकते.
2) ही प्रक्रिया सहसा केवळ अर्धा ते एक तास चालते
3) रुग्णाला सहसा दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडले जाते;
4) कुठेही कापले जात नाही किंवा टाके नसतात, त्यामुळे मधुमेही रुग्णांमध्येही उपयुक्त आहे.
5) मृत्यूची जोखिम आणि प्रक्रिये दरम्यान स्ट्रोकची गुंतागुंत शस्त्रक्रियेहून खूप कमी असते.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स