आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमकॉरोनरी अँजिओप्लास्टी - केस स्टडी

कॉरोनरी अँजिओप्लास्टी - केस स्टडी

केस 01 : खालील दिशेने जाणाऱ्या ह्रदयाच्या रोहिणीचा (LAD) डाव्या पुढच्या भागातील सुटा झालेला स्टेनोसिस

खालील दिशेने जाणाऱ्या ह्रदयाच्या रोहिणीचा (LAD) डाव्या पुढच्या भागातील सुटा झालेला स्टेनोसिस हे एक 50 वर्षांचे गृहस्थ आहेत ज्यांची तक्रार होती की गेल्या दोन महिन्यांपासून 5 मिनिटे चालले तरी छातीत वेदना होतात. त्यांना मधुमेह आणि हायपरटेन्शन दोन्हीही होते. ते दीर्घकाळ धूम्रपान करत होते. ह्रदयाच्या अँजिओग्राफीमध्ये मुख्य एलएडी(LAD) रोहिणीचा वेगळा झालेला तीव्र स्टेनोसिस दिसून आला. यावर अगदी साध्या पद्धतीने बलून अँजिओप्लास्टी आणि एक स्टेंट सरकवून उपचार केले गेले. प्रक्रियेनंतर 5 वर्षांनी रुग्ण व्यवस्थित आहे.

केस 02 : एलएडी(LAD) रोहिणीचा मोठ्या विभागाचा आजार

या रुग्णाला विम्यासाठी एक ट्रेडमिल स्ट्रेस ईसीजी(ECG) चाचणी करावी लागली. चाचणीमध्ये इस्केमिया पॉझिटिव आला आणि त्यानंतर ह्रदयाच्या अँजिओग्रामध्ये एलएडी(LAD) रोहिणीचा मोठ्या विभागाचा आजार आढळला. त्या रुग्णाला मधुमेह आणि हायपरटेन्शन नव्हते, परंतु एलडीएल(LDL) कोलेस्ट्रेरॉलच्या पातळ्या ठळकपणे वाढलेल्या होत्या. एकच लांब मेडिकेटेड स्टेंट घालून त्याची अँजिओप्लास्टी केली गेली. 6 आठवड्यांनंतरच्या ट्रेडमिल स्ट्रेस ईसीजी(ECG) चाचणीमध्ये इस्केमिया निगेटिव आला.

केस 03 : एलएडी( LAD) रोहिणी पूर्ण बंद होणे

या वृद्ध गृहस्थांना गेल्या 2 आठवड्यांपासून अस्थिर अँजायना होता. प्रारंभी त्यांच्यावर पारंपारिक उपचार केले गेले, परंतु छातीतील वेदना टिकून राहिल्यामुळे त्यांना अँजिओग्राफीसाठी नेले गेले. यामध्ये केवळ एक स्टंप दिसला आणि एलएडी(LAD) रोहिणी पूर्ण बंद झाल्याचे उघड झाले. ब्लॉकेज अलीकडीलच असेल असे गृहीत धरले असल्यामुळे, त्यांची अँजिओप्लास्टी केली गेली, ज्यामुळे एलएडी(LAD) रोहिणीमधील प्रवाह यशस्वीरित्या पूर्ववत सुरू झाला.

केस 04 : दूरस्थ सरकमफ्लेक्स रोहिणीच्या एकूण (99%) स्टेनोसिसची अँजिओप्लास्टी

60 वर्षांच्या वृद्ध मधुमेही महिलेला अँजायना पेक्टोरिससह, जिने चढताना घशात वेदना होत. ईसीजी(ECG) मध्ये कडेच्या लीड्समध्ये इस्केमिक बदल झाल्याचे दिसून आले. ह्रदयाच्या अँजिओग्राफीमध्ये दूरस्थ सरकमफ्लेक्स रोहिणीचा एकूण (99%) स्टेनोसिस दिसला. अँजिओप्लास्टी आणि एक स्टेंट वापरून यावर सहज उपचार केले गेले.

केस 05 : जवळच्या सरकमफ्लेक्स रोहिणीचा तीव्र स्टेनोसिस

या रुग्णाला कडेच्या भिंतीच्या इन्फार्क्टसह आयसीसीयू(ICCU) मध्ये दाखल गेले गेले. युरोकिनेससह थ्रम्बोलायटिक उपचार देऊनही, रुग्णाच्या छातीत वेदना होतच राहिल्या. रुग्णाला ह्रदयाच्या अँजिओग्राफीसाठी नेले गेले जिथे जवळच्या सरकमफ्लेक्स रोहिणीचा तीव्र स्टेनोसिस दिसून आला. इंटेग्रेलिन हे GP263a औषध दिल्यावर रुग्णाला अँजिओप्लास्टी आणि स्टेंट बसवण्यासाठी नेले गेले, ज्यामध्ये एक अतिशय मोठी सरकमफ्लेक्स आणि जड परिघीय रोहिणी उघडण्यात आली. प्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाची छातीतील वेदना त्वरीत गायब झाली.

केस 06 : ह्रदयाच्या पूर्ण बंद झालेल्या उजव्या दूरस्थ रोहिणीची अँजिओप्लास्टी

या 48 वर्षांच्या गोदी कामगाराला “गुटख्याचे” व्यसन होते, तसेच 6 महिन्यांपासून अँजायना होता. त्यांची इस्केमियाची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव होती, आणि ह्रदयाच्या अँजिओग्राफीमध्ये दूरस्थ आरसीए(RCA) बंद होऊन केवळ एका वाहिनीचा आजार दिसून आला. ब्लॉकपासून दूर असलेली उजवी ह्रदय रोहिणी ह्रदयाच्या डाव्या प्रणालीपासून प्रतिगामी फिलिंगमध्ये मोठी असल्याचे आढळले. संपूर्ण अडथळ्यातून एक हायड्रोफिलिक मार्गदर्शक वायर सरकवून अँजिओप्लास्टी करून, बलून फुगवला गेला आणि शेवटी अडथळ्याच्या ठिकाणी एक स्टेंट बसवला गेला. आधी बंद झालेली आरसीए(RCA) यामुळे उघडली आणि या तरुणाची शस्त्रक्रिया टाळता आली.

केस 07 : जवळच्या उजव्या हृदयाच्या रोहिणीचे पूर्ण स्टेनोसिस

या मध्यम वयीन स्टॉक ब्रोकरला 2 दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने दाखल केले गेले. ह्रदयाच्या अँजिओग्राफीमध्ये जवळच्या उजव्या हृदयाच्या रोहिणीचा तीव्र स्टेनोसिस दिसून आला तसेच लेझनमध्ये एक गुठळी असल्याचे सुचवले गेले. लेझनमधून गुठळी काढण्यासाठी ड्रायव्हर कॅथेटर नावाचा एक गुठळी काढणारा नवीन प्रकारचा कॅथेटर वापरण्यात आला. यानंतर अँजिओप्लास्टी करून रोहिणीमध्ये स्टेंट बसवला गेला. रोहिणीमध्ये ठळक गुठळी असल्यास त्यामुळे अँजिओप्लास्टी दरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी अँजिओप्लास्टी करण्यापूर्वी ह्रदय रोहिणीमध्ये इंटेग्रेलिन नावाचे औषध दिले जाते किंवा ड्रायव्हर कॅथेटर सारखे कॅथेटर वापरून गुठळी काढली जाते.

केस 08 : जवळच्या उजव्या हृदयाच्या रोहिणीचा वेगळा झालेला स्टेनोसिस

पूर्वे आफ्रिकेतील 57 वर्षांचे गृहस्थ गेल्या 2 वर्षांपासून श्रम केल्यावर छातीत वेदना होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना तीव्र मधुमेह होता आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडले होते. ते फार पूर्वीपासून धूम्रपान करत होते आणि त्यांना एम्फीसेमॅटस लंग डिसिज होता. अँजिओग्राफीमध्ये आरसीए(RCA)चा तीव्र वेगळा झालेला स्टेनोसिस आढळला ज्यावर अँजिओप्लास्टी आणि एक स्टेंट सरकवून उपचार केले गेले.

केस 09 : बायपास शस्त्रक्रिया अपयशी ठरल्यास अँजिओप्लास्टी

एका 67 वर्षांच्या मधुमेही पुरुषावर, 9 वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया केली गेली, त्यांना आठवड्याभरापासून श्रम केल्यावर छातीत वेदना होत होत्या, ईसीजी(ECG) मध्ये पुढच्या भिंतीच्या सब एन्डोकार्डिअल इस्केमियातील बदल दिसून आले. ह्रदयाच्या अँजिओग्रामध्ये एलएडी(LAD) च्या शीरेचे ग्राफ्ट पूर्णपणे बंद झाल्याचे आढळले.
लक्षणांच्या अलीकडील इतिहासामध्ये एलएडी(LAD) ग्राफ्टमध्ये रक्त गोठून ते बंद झाले असल्याचे सूचित होत होते. एलएडी(LAD) मध्ये ग्राफ्ट केलेल्या पूर्ण बंद झालेल्या शीरेतून चॉईस पीटी(PT) मार्गदर्शक वायर सरकवली गेली. बलून फुगवून विस्तारल्यावर, औषधाचे आच्छादन असलेले दोन स्टेंट बसवले गेले, ज्यामुळे मार्ग पूर्ण मोकळा होऊन एलएडी(LAD) रोहिणीमध्ये चांगला प्रवाह सुरू झाला.

3 दिवसांनंतर रुग्णालयातून सोडल्यावर, त्या रुग्णाला व्यवस्थित हिंडता फिरता येत होते आणि अँजायनाची सर्व लक्षणे दूर होऊन ईसीजी(ECG) तील बदल सामान्य झाले.
या केस अहवालात पुढील गोष्टी दिसतात:

1. शस्त्रक्रियात्मक रोपण बंद झाल्याचे/ बंद होत असल्याचे शोधण्यासाठी सीएबीजी(CABG) झालेल्या रुग्णाच्या अनाक्रमक मूल्यमापनाचे महत्त्व.
2. अगदी पूर्णपणे बंद झालेल्या ग्राफ्टमधूनही मार्ग मोकळा करण्यातील व्यवहार्यता.

Case 10 : Angioplasty during a Heart Attack!

A 60 year old man presented within 1 hour of acute heart attack, Anterior wall myocardial infarction was diagnosed on ECG, and he was taken up for emergency angioplasty. Coronary angiography revealed totally blocked LAD artery. A guide wire was used to cross the blockage, and balloon angioplasty was performed. A long medicated stent was then placed in the LAD artery. Patient recovered very well, and was discharged from hospital with no damage to the heart muscle as confirmed by echocardiography.

With facilities currently available in major hospitals in Mumbai and with experienced angioplasty experts, angiography can be performed safely within few hours of heart attack. The advantage is to restore blood flow to the heart muscle, prevent damage, and also to prevent complications of a heart attack such as cardiac arrhythmias.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स