आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमकॉरोनरी अँजिओप्लास्टी

कॉरोनरी अँजिओप्लास्टी

गेल्या दोन दशकांपासून, कॉरोनरी अँजिओप्लास्टी, स्टेंटिंग आणि इतर परक्युटेनस प्रक्रियांमुळे ह्रदयाच्या रोहिण्यांच्या विकारांच्या उपचारांमध्ये क्रांती घडली आहे.

ह्रदयाच्या रोहिण्यांचे शरीरशास्त्र कॉरोनरी अँजिओग्राफीद्वारे विषद केले जाते.

कॉरोनरी अँजिओग्राफीची प्रमाणित पद्धत ही मांडीच्या सांध्यातील रोहिणीमध्ये छिद्र करून केली जात, परंतु आता हाताच्या त्रिज्यात्मक रोहिणीद्वारे ह्रदयाची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणे शक्य झाले आहे. रुग्णासाठी हे अतिशय सोयीस्कर आहे, कारण यासाठी पूर्ण बेड रेस्ट आवश्यक नसते आणि रुग्णाला काही तासांमध्ये घरी सोडले जाऊ शकते (आकृती 3 ).

ह्रदयाच्या रोहिणीतील स्टेनोसिस विस्तारण्यासाठी एक कोरोनरी बलून वापरला जातो ज्यातून स्टेंटचे रोपण करण्यासाठी मार्ग निर्माण केला जातो (आकृती 4 ).

स्टेंट्स या धातूच्या स्प्रिंग असतात, त्या सहसा स्टेनलेस स्टीलच्याही बनलेल्या असतात. बलून अँजिओप्लास्टी झाल्यानंतर रोहिणी बंद होण्यास प्रतिबंध करण्यासाठी, त्या ह्रदयाच्या रोहिण्यांच्या आत बसवल्या जातात. ह्रदयाच्या रोहिण्यांमध्ये पुन्हा अवरोध निर्माण होण्यास तसेच रिस्टेनोसिसला स्टेंट्समुळे प्रतिबंध होतो. नवीन स्टेंट्सवर रॅपानीसिन किंवा पॅक्लिटाक्सेल या खास औषधांचे आवरण असते, ज्यामुळे रिस्टेनोसिसच्या घटना ठळकपणे कमी झाल्या आहेत आणि ह्रदयाच्या रोहिण्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी कॉरोनरी अँजिओप्लास्टीला प्राधान्य दिले जात आहे. असे म्हणता येईल की, औषधी स्टेंट्सच्या उपलब्धतेमुळे, ह्रदयाच्या रोहिण्यांचा विकार असलेल्या रुग्णांवर तांत्रिकदृष्ट्या अँजिओप्लास्टी करणे शक्य नसेल तरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.

कॉरोनरी अँजिओप्लास्टीचे वर्तमान संकेत:

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स