आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होम डीप व्हेन थ्रम्बोसिस – केस स्टडी

डीप व्हेन थ्रम्बोसिस – केस स्टडी

केस 01 : थ्रम्बोलायसिसद्वारे उपचार केलेला अत्यंत तीव्र डीव्हीटी(DVT)

एका 30 वर्षे वयाच्या महिलेला गर्भधारणेनंतर डीप व्हेन थ्रम्बोसिसचा इतिहास होता. हेपारिन आणि वार्फारिनचे पारंपारिक उपचार देऊनही सुधारणा होत नव्हती. त्यांच्या डाव्या पायामध्ये ठळक बदल घडले. आम्ही डाव्या इलियक शिरेतील मार्ग मोकळा केला आणि गुठळी विरघळवण्यासाठी 24 तास युरोकिनेस इनफ्युज केले. त्यानंतर बलून विस्तारला आणि आयव्हीसी(IVC) मध्ये रक्तवाहिनीचा प्रवाह पूर्ववत झाला. 2 आठवड्यांमध्ये, डाव्या पायावरील सूज चांगलीच उतरली.

केस 02 : पल्मनरी थ्रम्बो एम्बोलिझमच्या केसमध्ये आयव्हीसी(IVC) फिल्टर बसवणे

इलियक शीर समाविष्ट असलेल्या डीप व्हेन थ्रम्बोसिसमध्ये एम्बोलस फुफ्फुसांपर्यंत जाऊन फुफ्फुस रोहिणीला अडथळा निर्माण करून गुंतागुंतीचा ठरू शकतो. याची लक्षणे म्हणजे छातीत वेदना, अचानक धाप लागणे, रोहिणीची संपृक्तता कमी होणे. अनेक प्रकरणे जीवघेणी ठरू शकतात. जेव्हा डीव्हीटी(DVT) ला दुय्यम असलेल्या पल्मनरी एम्बोलिझमचे निदान केले जाते तेव्हा, पुढील गोष्टी टाळणे आवश्यक असते. तसेच, जर अल्ट्रासाउंड तपासणीमध्ये इलियक शिरेतील गुठळी आयव्हीसी(IVC) च्या दिशेने सरकली किंवा ती हालणारी असेल तर, ती वरच्या दिशेने जाण्यापूर्वीच तिला प्रतिबंध केला पाहिजे. आयव्हीसी(IVC) मध्ये धातूचा फिल्टर बसवून हे करता येते, गुठळी वरच्या दिशेने जाऊ लागली की हा फिल्टर तिला पकडतो. फेमोरल शिरेचा मार्ग मोकळा करून किंवा गळ्याच्या रक्तवाहिनीच्या मार्गाने अप्रभावित बाजूने त्वचेतून आयव्हीसी(IVC) फिल्टर बसवून हे साध्य करता येते. वरील चित्रामध्ये आधीच पल्मनरी एम्बोलिझमच्या सौम्य घटना घडलेल्या एका महिलेला गळ्याच्या मार्गाने फिल्टर बसवलेला दाखवला आहे.

केस 03 : डाव्या इलियक शिरेमध्ये 6 महिन्यांपासून निर्माण झालेल्या जुनाट अवरोधातून पूर्ण मार्ग मोकळा करणे

एका 18 वर्षांच्या मुलीच्या डाव्या पायामध्ये तीव्र डीप व्हेन थ्रम्बोसिस तयार झाला. शिरेच्या डॉपलरमध्ये संपूर्ण पायाच्या खोल शिरांमध्ये थ्रम्बोसिस असल्याचे दिसले तसेच, डावी सामाईक इलियक शीर पूर्णपणे बंद झाली होती. तीन आठवडे तिच्यावर हेपारिन आणि वार्फारिनचे पारंपारिक उपचार केले गेले, परंतु काहीही सुधारणा झाली नाही. तिच्या पायावर खूप सूज येणे चालूच राहिले.
कॅथेटर निर्देशित थ्रम्बोलायसिससाठी तिला एक आदर्श उमेदवार मानले गेले. अँजिओग्राफीच्या प्रयोगशाळेमध्ये, लोकल अॅनेस्थेशियाखाली, डाव्या सुपरफिशिअल फेमोरल शिरेमध्ये 18 गेजची सुई सरकवून एक 5 फ्रेंच शीथ शिरेमध्ये बसवला गेला. अँजिओग्राफीमध्ये पुष्टी झाली की इलियक शीर पूर्णपणे बंद झालेली होती आणि खालच्या व्हेना कावाकडे अजिबात प्रवाह जात नव्हता. त्यानंतर एक मार्गदर्शक वायर गुठळीतून पुढे सरकवून बंद जागेमधून खालच्या व्हेना कावापर्यंत पोहोचवली गेली. वायरद्वारे एक विशेष इनफ्युजन कॅथेटर सरकवला गेला आणि याद्वारे 24 तासांसाठी युरोकिनेसचे इनफ्युजन दिले गेले. 24 तासांनंतर तपासणीसाठी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये आयव्हीसी(IVC) मध्ये वरच्या दिशेने आंशिक प्रवाह जात असल्याचे दिसले. त्यानंतर संपूर्ण रक्त गोठलेली वाहिनी अँजिओप्लास्टी बलूनने विस्तारण्यात आली आणि अंतीम अँजिओग्राममध्ये खालच्या व्हेना कावापर्यंत उत्तम प्रवाह जात असलेली उघडलेली रक्तवाहिनी दिसली.
सूज ठळकपणे उतरली आणि उपचारांनंतर 3 दिवसांमध्ये पूर्णपणे गायब झाली. उपचारांनंतर 10 दिवसांनी केलेल्या डॉपलर अभ्यासामध्ये रुग्णाच्या सामाईक आणि बाह्य इलियक शिरा दिसून आल्या, ज्यामध्ये खोल फेमोरल आणि पॉपलिटीअल शिरांमधील मार्ग चांगल्याप्रकारे मोकळा झालेला दिसत होता.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स