आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमइलियक रोहिणी अँजिओप्लास्टी - केस स्टडी

इलियक रोहिणी अँजिओप्लास्टी - केस स्टडी

केस 01

एका 45 वर्षांच्या गृहस्थांना उजव्या कुल्ल्यामध्ये आणि उजव्या मांडीमध्ये चालताना तीव्र वेदना होत होत्या. ही वेदना गेल्या 6 महिन्यांमध्ये वाढत गेली होती आणि आम्हाला दाखवायला आले तेव्हा त्यांना 100 मीटरहून जास्त चालता येत नव्हते.
चिकित्सिय तपासणीमध्ये त्यांच्या उजव्या फेमोरल रोहिणीची नाडी लागत नसल्याचे आढळले. उजवा पाय डाव्या पायाहून किंचित जास्त थंड होता.
रोहिणीचे डॉपलर अल्ट्रासाउंड तपासणीतून दिसून आले की उजवी सामाईक इलियक रोहिणी पूर्णपणे बंद झाली होती आणि उजव्या पायाच्या दूरच्या टोकापर्यंत खूपच कमी प्रवाह पोहोचत होता.

प्रक्रिया:

रुग्णाची पेरिफेरल अँजिओप्लास्टीची तयारी केली गेली. लोकल अॅनेस्थेशिया देऊन डाव्या सुपरफिशिअल फेमोरल रोहिणीचा मार्ग मोकळा केला गेला आणि अँजिओग्राफी करण्यासाठी महाधमनीमध्ये एक कॅथेटर बसवला गेला. यामध्ये उजवी इलियक रोहिणी पूर्ण बंद झाल्याची पुष्टी झाली (आकृती 1). आनुषंगिक साधनांद्वारे दूरस्थ फेमोरल रोहिणी भरत असल्याचे दिसले. हा मार्गदर्शक नकाशा वापरून, उजव्या फेमोरल रोहिणीमध्ये मार्ग तयार केला गेला आणि इलियक रोहिणीतून आरपार नेण्यासाठी एक टेरुमो मार्गदर्शक वायर वापरली गेली. बलूनने विस्फारल्यानंतर (आकृती 2), संपूर्ण अडथळ्यामध्ये एक स्टेंट बसवला गेला, अंतिम निकालामध्ये रक्तवाहिन्या उत्तम उघडलेल्या आणि दूरपर्यंत प्रवाह जात असल्याचे दिसले. संपूर्ण प्रक्रिया साधारण 30 मिनिटांत केली गेली.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:

इलियक रोहिणी पूर्ण बंद झाली असल्यास हल्ली अँजिओप्लास्टी आणि स्टेंट बसवण्याच्या प्रक्रियेने हे सहजपणे हाताळता येते. निटिनॉल स्टेंट्सने, रिस्टेनोसिसच्या शक्यता अत्यंत कमी आहेत. इलियक रोहिणी स्टेनोसिस किंवा बंद होण्यासाठी रक्तवाहिनीची शस्त्रक्रिया क्वचितच सुचवली जाते.

इलियक आजारासाठी अँजिओप्लास्टी हे प्रारंभीक उपचार आहेत:

तांत्रिक यशाचा दर : 90%
अँजिओग्राफिक पेटन्सी : 2 वर्षांमध्ये 73% (केवळ बलून)
2 वर्षांमध्ये 94% (स्टेंट)
(क्लेव्हलँड क्लिनिक जे ऑफ मेड, 1997; 64:429-436)

केस 02

दीर्घकाळ धूम्रपान करणारे, मधुमेही आणि हायपरटेन्शन असलेले एक 53 वर्षीय गृहस्थ दोन्ही पायांमध्ये आणि डाव्यापेक्षा उजव्यामध्ये जास्त क्लॉडिकेशन वेदना होत असल्याची तक्रार करत होते. उजवे फेमोरल स्पंदन जाणवत नव्हते आणि डावी फेमोरल रोहिणी मंद लागत होती.

डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफीमध्ये उजवी इलियक रोहिणी पूर्णपणे बंद झालेली असून, डाव्या इलियक रोहिणीमध्ये गंभीर स्टेनोसिस आढळला. लोकल अॅनेस्थेशियाखाली, नाडी लागत नसूनही, दोन्ही फेमोरल रोहिण्यांचा मार्ग मोकळा केला गेला आणि इलियक रोहिणी बलूनने विस्फारित करून स्टेंट बसवला गेला, याचे अँजिओप्लास्टीनंतरचे निकाल उत्कृष्ठ मिळाले. रुग्णाला लक्षणांपासून त्वरित आराम मिळाला.

केस 03

एका 50 वर्षे वयाच्या गृहस्थाला एक महिन्यापासून 50 मीटरहून जास्त चालले तरी उजव्या मांडीमध्ये वेदना होत होत्या. उजव्या फेमोरल रोहिणीचे स्पंदन मंद होते आणि रोहिणीच्या डॉपलर अल्ट्रासाउंड अभ्यासामध्ये उजव्या सामाईक इलियक रोहिणीमध्ये ठळक कॅल्सिफिक स्टेनोसिस असल्याचे दिसले. या केसमध्ये इलियक रोहिणीची अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवला गेला आणि रुग्णाला संध्याकाळी घरी सोडले गेले.

केस 04

डावी इलियक रोहिणी पूर्णपणे बंद होणे
शस्त्रक्रियेविना पायाचे विच्छेदन टाळणे
हायपरटेन्शन, मधुमेह आणि इस्केमिक ह्रदयरोगाचा ज्ञात इतिहास असलेल्या एका 60 वर्षाच्या गृहस्थांची गेल्या 15 दिवसांपासून डाव्या पायामध्ये तीव्र वेदना असल्याची तक्रार होती.

चिकित्सियरित्या, डाव्या पायामध्ये नाडी लागत नव्हती आणि पाय अत्यंत थंड पडलेला होता. कलर डॉपलर अल्ट्रासाउंडमध्ये डावी इलियक रोहिणी पूर्णपणे बंद झाल्याची पुष्टी झाली. अँजिओग्राफी केल्यावर डावी बाह्य इलियक रोहिणी पूर्णपणे बंद झाल्याचे आढळले.

इलियक रोहिणीमध्ये हिपॅरिन दिले गेले आणि पूर्ण बंद झालेल्या रोहिणीतून एक 0.035 इंच मार्गदर्शक वायर सरकवली गेली व त्यानंतर 5 फ्रेंच बहुउद्देशीय कॅथेटर घातले गेले. फेमोरल रोहिणीमध्ये थोड्या अंटिग्रेड प्रवाहासह आंशिक मार्ग तयार झाल्याचे दिसले, ज्यामध्ये एक गुंतागुंतीचा स्टेनोसिसही दिसून आला. मध्य एसएफए(SFA) मध्ये एक बहुउद्देशीय कॅथेटर बसवला गेला आणि केलेल्या अँजिओमध्ये दूरस्थ एसएफए(SFA) पूर्ण बंद झाल्याचे आणि दूरस्थ प्रवाह अजिबात नसल्याचे दिसून आले. 500,000 युनिट्स युरोकिनेस बोलस दिले गेले आणि इलियक रोहिणी आणि एसएफए(SFA) मध्ये दोन सिरियल स्टेंट बसवले गेले. बहुउद्देशीय कॅथेटर दूरस्थ एसएफए(SFA) पर्यंत नेला गेला आणि 24 तासांसाठी युरोकिनेस इनफ्युजन चालू ठेवले गेले.

48 तासांनंतर तपासणीसाठी केलेल्या अँजिओमध्ये डाव्या पायाच्या बोटांपर्यंत पूर्णपणे स्पष्ट रोहिण्या दिसल्या. रुग्णामध्ये नाट्यमयरित्या सुधारणा झाली आणि 3 दिवसांनंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडले गेले.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स