आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमआयव्हीसी(IVC) फिल्टर

आयव्हीसी(IVC) फिल्टर

पल्मनरी थ्रम्बो एम्बॉलिझमसाठी खालचा व्हेना कावा फिल्टर बसवणे

26 वर्षांच्या एका तरुणीच्या पहिल्या बाळंतपणानंतर डाव्या पायामध्ये डीप व्हेन थ्रम्बोसिस विकसित झाला. 2 दिवसांनंतर तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि धाप लागली. तपासण्यांमध्ये आयव्हीसी(IVC) पर्यंत जाणारी डावी सामाईक इलियक शीर बंद झाल्याचे दिसले. छातीच्या एक्स-रे मध्ये पल्मनरी एम्बोलिझमच्या खुणा दिसल्या.
तिला लोकल अॅनेस्थेशियाखाली उजव्या फेमोरल शिरेतून त्वचेखाली आयव्हीसी(IVC) फिल्टर बसवला गेला. तिला रक्त साकळण्यास रोधक औषधे सुरू केली गेली. त्यानंतर तिला पल्मनरी एम्बोलिझमचा त्रास झाला नाही.
डीप व्हेन थ्रम्बोसिस नंतर जीवघेण्या पल्मनरी थ्रॉम्बोलिझमला प्रतिबंध करण्याची आयव्हीसी(IVC) फिल्टर बसवणे ही एक प्रस्थापित पद्धत आहे. ही प्रक्रिया तुलनेने सोपी आहे आणि लोकल अॅनेस्थेशियाखाली 15 मिनिटांमध्ये पूर्ण होते. आयव्हीसी(IVC) फिल्टर मूत्रपिंडाच्या रोहिण्यांखाली आयव्हीसी(IVC) मध्ये बसवला जातो आणि आयव्हीसी(IVC) मध्ये वाहात येणाऱ्या मोठ्या गुठळ्या पकडण्यास हा फिल्टर मदत करतो.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स