आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होमपेरिफेरल अँजिओप्लास्टी

पेरिफेरल अँजिओप्लास्टी

शीरा अरुंद का होतात?

सर्वात सामान्य कारणांमध्ये समावेश होतो: मधुमेह, सिगारेटचे धूम्रपान, उच्च रक्तदाब, आणि रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी. सामान्यतः शरीराच्या खालील भागातील अवयवांच्या रोहिण्यांमध्ये पीएओडी(PAOD) दिसून येते.

लक्षणे काय आहेत?

शरीराच्या खालील अवयवांतील, रोहिण्या अरुंद झाल्यामुळे चालताना किंवा जिने चढताना प्रारंभी पोटऱ्यांमध्ये वेदना होतात आणि पेटके येतात. आराम केल्यावर या वेदना जातात अशाप्रकारच्या वेदनेला ‘इंटरमिटंट क्लॉडिकेशन’ म्हणतात. हळूहळू, रोहिण्या अरूंद होण्याची तीव्रता वाढत जाते, वेदनेविना व्यक्तीला जितके अंतर चालता येते ते कमी होत जाते. तीव्र प्रकरणांमध्ये, आराम करताना सुद्धा वेदना होतात, सहसा रात्री.

रक्त वाहिन्यांचे अरुंद होणे गंभीर होत गेल्यामुळे, पायावरील केस गळतात आणि नखांचा व त्वचेचा रंग बदलतो. इजेनंतर, जखम बरी होण्यास वेळ लागू शकतो, ज्यामुळे अल्सर तयार होतो. लवकरच गँग्रीन होते, अवयवांचा रंग बदलतो आणि शेवटी त्या अवयवाचे विच्छेदन करावे लागू शकते. इंटरमिटंट क्लॉडिकेशन वयोपरत्वे वाढत जाते आणि 50 वर्षांहून जास्त वयाच्या 5% पुरुषांमध्ये आणि 2.5% स्त्रियांमध्ये हे घडते. अर्ध्याअधिक रुग्णांमध्ये, ही स्थिती अनेक वर्षे स्थिर राहते. तथापि, चार पैकी एका रुग्णाची परिस्थिती बिघडते आणि काही जणांना अवयव विच्छेदन आवश्यक ठरू शकते, खास करून मधुमेही आणि धूम्रपान करणाऱ्यांना.

या स्थितीचे निदान कसे होते?

हे शोधून काढण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे प्रभावित रोहिणीचा नाडीचा दर कमजोर असणे. रोहिण्यांची एक विशेष अल्ट्रासाउंड चाचणी (रोहिणीची कलर डॉपलर चाचणी) या निदानाची पुष्टी करते. डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी नावाचा एक विशेष अँजिओग्राम करून अंतिम निदान केले जाते.

शरीरातील कोणत्या रोहिण्या उघडता येतात?

अरुंद किंवा अवरोधित झालेली शरीरातील कोणतीही रोहिणी उघडता येते. पाय, मूत्रपिंडे आणि मेंदूच्या रोहिण्यांवर सर्वाधिक प्रभाव पडतो. मेंदूच्या रोहिण्या अवरोधित झाल्यामुळे चेहरा आणि हातपाय लुळे पडू शकतात आणि नंतर अर्धांगवायू होऊ शकतो. खरे तर, या नसा उघडणे (कॅरोटिड आर्टरी अँजिओप्लास्टी) हे मोठ्या प्रमाणावर रुग्णांमध्ये अर्धांगवायूला प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाणारे एक अत्याधुनिक तंत्र आहे.

इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंटचा कधी विचार करावा?

गँग्रीन आणि अवयव विच्छेदनास प्रतिबंध करण्यासाठी, अरुंद होणाऱ्या रोहिण्यांचे तत्परतेने निदान करून त्यांवर उपचार करणे आवश्यक आहे. पुढील परिस्थितींमध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीचा प्रामुख्याने विचार करावा :
1) क्लॉडिकेशनचे अंतर हळूहळू कमी होत जाणे – जेव्हा रुग्णाला जाणवते की त्याला वेदनेमुळे पूर्वीपेक्षा कमी अंतर चालता येते.
2) आराम करताना वेदना व अस्वस्थता टिकून राहणे.
3) अवयवाच्या त्वचेच्या रंगामध्ये बदल.
4) विरुद्ध बाजूच्या अवयवाच्या तुलनेत एखादा अवयव जास्त थंड पडायला लागणे.
5) गँग्रीनमधील प्रारंभिक बदल.
6) नेहमीच्या उपचारांना प्रतिसाद न देणारा डायबेटिक फूट.

शस्त्रक्रिया कशी टाळता येते?

रक्तवाहिन्या खूप जास्त अरुंद झाल्या असल्यास विशेष“इंटरव्हेन्शनल तंत्रांद्वारे”रुग्णांवर उपचार करणे आता शक्य आहे. लोकल ऍनेस्थेशिया देऊन एक लहानशी सुई पायाच्या रोहिणीमध्ये सरकवली जाते. एक बारीक वायर त्यातून सोडली जाते आणि रोहिणीच्या अरूंद झालेल्या भागातून पुढे नेली जाते. नंतर अरूंद जागेमध्ये एक लहानसा फुगा बसवून फुगवला जातो, ज्यामुळे कोलेस्ट्रेरॉलचा अडथळा संकुचित होऊन सपाट केला जातो. यामुळे रोहिणी पुन्हा उघडते आणि रक्तप्रवाह पूर्ववत होतो. या तंत्राला बलून अँजिओप्लास्टी म्हणतात आणि ते ह्रदयाच्या रोहिण्या उघडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रासारखेच असते.
वृद्ध, नाजूक लोक आणि ह्रदय, फुफ्फुसे आणि मूत्रपिंडाचे विकार असलेल्या रुग्णांमध्ये हे तंत्र सुरक्षितपणे वापरता येते. बलून अँजिओप्लास्टी प्रक्रियांचा यशाचा दर उच्च आहे. तथापि, बलून अँजिओप्लास्टीने उघडलेल्या काही रोहिण्या कालांतराने पुन्हा अरुंद होऊ शकतात. थोडक्यात म्हणजे, रक्तवाहिनी जितकी मोठी असेल तितकी ती पुन्हा अरूंद होण्याची शक्यता कमी असते. ज्या प्रकरणांत फिजिशियनना शंका असते की रक्तवाहिनी पुन्हा अरुंद होण्याचा दर जास्त आहे तिथे “स्टेंटचे रोपण” केले जाते. स्टेट्स या धातूच्या लहान स्प्रिंग असतात ज्या रोहिणीमध्ये सरकवल्या जातात. रक्तवाहिनी उघडण्यासाठी ते जोरात आत घुसतात. रोहिणीत टोचलेल्या सुईच्या छिद्रातूनच स्टेंट्स आत सरकवले जातात आणि त्यासाठी कोणतीही शस्त्रक्रियेची प्रक्रिया करावी लागत नाही.
स्टेंट बसवल्यानंतर, रोहिणी अरुंद होण्याची शक्यता खूप कमी असते आणि त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टळते. कधीकधी, रक्ताच्या गुठळीमुळे (थ्रोम्बस) रोहिणीमध्ये अवरोध निर्माण होतो. अशावेळी, गुठळीच्या ठिकाणी एक खास प्लास्टिकची नळी (कॅथेटर) रोहिणीमध्ये बसवली जाते. रक्ताची गुठळी विरघळवण्यासाठी, या नळीतून स्ट्रेप्टोकिनेस, युरोकिनेस आणि रीप्रो यांसारखी औषधे टोचली जातात. ही औषधे टोचल्यानंतर, रोहिणीतील गुठळीच्या खाली कोलेस्ट्रेरॉलमुळे काही अवरोध निर्माण झाला असेल तर तो संकुचित करण्यासाठी अतिरिक्त बलून अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग आवश्यक बनू शकते.

शस्त्रक्रियेच्या तुलनेत काय फायदे आहेत?

लोकल ऍनेस्थेशिया देऊन पीएओडी(PAOD) चे इंटरव्हेन्शनल उपचार केले जातात आणि ही प्रक्रिया सहसा अर्धा तास ते दोन तास चालते. नंतर, 24 ते 48 तासांमध्ये रुग्णाला घरी सोडले जाऊ शकते आणि तो चालत घरी जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारे चिरा, छेद दिला जात नाही किंवा टाके घातले जात नाही, त्यामुळे संक्रमणाची शक्यता नगण्य असते (खास करून मधुमेहींसाठी हे महत्त्वाचे आहे).
पुढे, ज्या रुग्णांना ठळक पीएओडी(PAOD) असेल त्यांच्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्याही अरूंद झालेल्या असू शकतात आणि त्यांना शस्त्रक्रिया करावी लागण्याची मोठी जोखिम असते. शस्त्रक्रियेमध्ये, एक विशेष सिंथेटिक ग्राफ्ट वापरून अवरोध वगळून स्वतंत्र मार्ग तयार केला जातो. बहुतांश शस्त्रक्रिया या जनरल ऍनेस्थेशिया देऊन केलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया असतात आणि रुग्णांना निदान 7 ते 10 दिवस रुग्णालयात राहावे लागते. याशिवाय, इंटरव्हेन्शनल तंत्रापेक्षा शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेचा मृत्यू आणि विकृती दर जास्त असतो.
हे सांगायलाच नको की, जगभरामध्ये, पीएओडी(PAOD) च्या उपचारांसाठी इंटरव्हेन्शनल तंत्राला प्रथम प्राधान्य दिले जाते. तथापि, काही प्रकरणांत हे तंत्र काम करत नाही. अशा प्रकरणांत शल्यक्रियात्मक इंटरव्हेन्शन आवश्यक असेल.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स