आम्हाला येथे कॉल करा : 022 - 23525001 / 23526001

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.30 ते दुपारी 4

होममूत्रपिंडाच्या रोहिणीची अँजिओप्लास्टी - केस स्टडी

मूत्रपिंडाच्या रोहिणीची अँजिओप्लास्टी - केस स्टडी

केस 01 : 220/120 mm Hg रक्तदाब असलेली एक तरुण मुलगी (18 वर्षे)

कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका तरूण मुलीला तीव्र डोकेदुखी होऊ लागली आणि दृष्टी अंधूक झाली. तपासणीतून खूप उच्च रक्तदाब दिसून आला. मूत्रपिंडाचे कार्य सामान्य होते. मूत्रपिंडाच्या रोहिणीच्या डॉपलरमध्ये मूत्रपिंडाच्या उजव्या रोहिणीच्या मधल्या भागात तीव्र स्टेनोसिस असल्याचे आढळले. या अरुंद ठिकाणी बलून अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्याचे उत्कृष्ठ निकाल मिळाले आणि रक्तदाब त्वरित सामान्य वर आला. तरुण रुग्णांमध्ये, मूत्रपिंडाची रोहिणी अरुंद होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे फायब्रोमस्क्युलर डिस्प्लेशिया. ही एक प्रक्षोभक स्थिती असल्यामुळे, अशा प्रकारच्या आजारामध्ये सहसा स्टेंट बसवणे सूचित केले जात नाही. दीर्घकालीन निकाल खूपच प्रोत्साहन देणारे असतात.

केस 02 : हायपरटेन्शन आणि मूत्रपिंडाचे असामान्य कार्य होत असलेले वृद्ध गृहस्थ

एका 70 वर्षाच्या गृहस्थांचा रक्तदाब सातत्याने वाढत होता आणि सिरम क्रिएटाईनची पातळी 2.2 मिग्रॅ % होती. अनेक अँटी हायपरटेन्सिव्ह औषधे देऊनही उच्च रक्तदाब नियंत्रित होत नव्हता. मूत्रपिंडाच्या रोहिणीच्या डॉपलर अभ्यासातून खालच्या डाव्या मूत्रपिंडाच्या रोहिणीच्या गंभीर स्टेनोसिसची पुष्टी झाली. या रोहिणीची अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवला गेला. रक्तदाब नियंत्रणात आणला गेला आणि मूत्रपिंडाचे कार्यही सुधारले.
वृद्ध रुग्णांमध्ये, स्टेनोसिसचे सर्वात सामान्य कारण अथेरोस्क्लेरोसिस असते. सहसा त्याच्याशी निगडीत कॅल्सिफिकेशनही असू शकते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये, रिस्टेनोसिस टाळण्यासाठी, स्टेंट बसवणे आवश्यक असते.

केस 03 : मूत्रपिंडाच्या मुख्य रोहिणीमध्ये स्टेंट बसवणे

या 75 वर्षे वयाच्या महिलेला एक महिन्यापासून तीव्र डोकेदुखी होती. त्यांना अलीकडेच तीव्र हायपरटेन्शनचा त्रास झाला होता. डॉपलर अल्ट्रासाउंडमध्ये मूत्रपिंडाच्या रोहिणीचा स्टेनोसिस आढळला, ज्याची अँजिओग्राफीद्वारे पुष्टी केली गेली. मूत्रपिंडाच्या रोहिणीमध्ये बलून विस्तारित करून त्यांना स्टेंट बसवला गेला ज्यामुळे उच्च रक्तदाबापासून त्वरित आराम मिळाला.

केस 04 : वाचलेल्या एकमेव मूत्रपिंडावरील अँजिओप्लास्टी

या 85 वर्षांच्या जेष्ठ महिलेचे नेफ्रॉलॉजिस्टने निदान केले की त्यांना तीव्र हायपरटेन्शन असून मूत्रपिंड निकामी होऊन सिरम क्रिएटाईनची पातळी 6 मिग्रॅ% झाली आहे. अल्ट्रासाउंड डॉपलरद्वारे तपासण्या केल्यावर उजव्या मूत्रपिंडाची रोहिणी बंद झाल्याचे आणि उजव्या मूत्रपिंडाच्या रोहिणीमध्ये तीव्र 95% स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या महिलेची यशस्वी अँजिओप्लास्टी केली गेली आणि डाव्या मूत्रपिंडाच्या टिकून असलेल्या एकमेव रोहिणीमध्ये स्टेंट बसवला गेला. एक आठवड्यामध्ये, कोणतीही हायपरटेन्शनरोधक औषधे न घेता रक्तदाब सामान्य झाला आणि एक महिन्यामध्ये सिरम क्रिएटाईन 1.3 मिग्रॅ % इतके सामान्य झाले.

आमच्या फिजिशियन्सनी देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार 6 जानेवारी 2003 रोजी जसलोक रुग्णालयात केले

13 वर्षे
लेसर उपचारांची

15000 हून जास्त प्रकरणांवर
यशस्वीपणे उपचार केले

कॉपीराईट ©2018 डॉक्टर हाऊस कार्डिओ व्हसक्युलर सेंटर. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स