वारंवार विचारले जाणारे प्रश्न

स्पायडर आणि व्हेरिकोज व्हेन्स कशामुळे होतात?

स्पायडर आणि व्हेरिकोज व्हेन्सचे अचूक कारण कोणालाही माहीत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये त्या विकसित होण्याची शक्यता असलेले अनेक घटक आहेत.

महिलांमध्ये, पायांवर व्हेरिकोज व्हेन्स असणे हे अनेकदा अधिक तीव्र आरोग्याच्या समस्या सूचित करते - पेल्विक कन्जेशन सिंड्रोम.
बिजाशये आणि ओटीपोटाच्या प्रदेशाचे कार्य योग्यप्रकारे होत नसल्यामुळे पेल्विक कन्जेशन सिंड्रोम होतो, जो पोट, नितंब, जननेंद्रिय आणि पायांवर व्हेरिकोसायटिसच्या स्वरूपात दिसून येतो. ज्या स्त्रियांना ओटीपोटामध्ये सर्वसाधारण अशीनेसचा त्रास होतो, खास करून उभे राहताना, काही उचलताना किंवा शरीर संबंधांदरम्यान, त्यांना या स्थितीचा त्रास असू शकतो.

व्हेरिकोज व्हेन्सच्या विरुद्ध स्पायडर व्हेन्स या आसपासच्या व्हेरिकोसायटिसमुळे निर्माण झालेल्या दबावा व्यतिरिक्त अन्य वाढीव दबावाच्या प्रतिसादात घडत नाहीत. त्या अनेकदा स्त्रीचे संप्रेरक इस्ट्रोजेनमुळे उद्भवतात म्हणूनच या स्पायडर व्हेन्स महिलांमध्ये सर्वात सामान्यपणे दिसतात. स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळ्या जेव्हा वाढतात, जसे की जेव्हा त्या गर्भवती असतील, संतती नियमनाच्या तोंडी गोळ्या घेत असतील आणि अर्थातच इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपी घेत असतील तेव्हा तेव्हा त्यांना स्पायडर व्हेन्स होण्याची शक्यता जास्त असते.

शिरांच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी मी काय करावे?

एकदा का तुम्हाला व्हेरिकोज आणि स्पायडर व्हेन्स झाल्या की त्या वैद्यकीय उपचारांशिवाय जात नाहीत. रक्तवाहिन्यांच्या आजाराची वाढ संथ करण्यासाठी लवकर वैद्यकीय सल्ला विचारणे महत्त्वाचे असतेच, त्याच बरोबर शिरेच्या लक्षणांचे उपशमन करण्यासाठी काही पारंपारिक उपाययोजनाही आहेत:

टीप: रोहिण्या आणि शिरांचा त्रास सहसा भिन्न वैद्यकीय स्थितींमध्ये होत असतो आणि खूप जास्त स्निग्धांशयुक्त पदार्थ टाळण्याबाबत चेतावणी दिली जाते तसेच कोलेस्ट्रेरॉलमुळेही "रोहिण्या कडक होतात" परंतु त्यांचा पायांच्या शिरांवर काहीही परिणाम होत नाही.

चालण्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स वाढतात का?

नाही. उलट, चालणे फायदेशीर आहे. तुम्ही चालता तेव्हा तुमच्या पायांतील स्नायू आकुंचित होऊन शिरांना पिळून काढतात, त्यामुळे रक्तप्रवाह परत ह्रदयाकडे जाण्यास बळ मिळते. जर चालण्यामुळे त्रास होत असेल तर, चालण्यामुळे तुम्हाला का त्रास होतो आहे हे तपासण्यासाठी तुमच्या फिजिशिअनला भेटा (उदा. व्हेरिकोज व्हेन्स व्यतिरिक्त इतर कोणती कारणे टाळणे आवश्यक आहे का). हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना देण्यासाठी चालणे हा देखील उत्तम व्यायाम आहे.

व्हेरिकोज व्हेन्ससाठी मी डॉक्टरांना भेटावे का?

डॉक्टरांना भेटावे का हे ठरवताना हे महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा : व्हेरिकोज व्हेन सुजलेल्या, लाल किंवा खूप हळव्या झाल्या आहेत का किंवा स्पर्शाला गरम लागतात का?

नसल्यास, उपचार केलेल्या शिरेसाठी सांगितलेल्या टिप्सनुसार स्वतःची काळजी घ्या.
यामुळे त्वचेच्या लहान भागांवर बधीरपणा, जळजळ किंवा शस्त्रक्रियेच्या व्रणाभोवतीची संवेदना बदलू शकते. शस्त्रक्रियेची सर्वात गंभीर परंतु दुर्मिळ गुंतागुंत म्हणजे, खोल शिरेमध्ये रक्ताची गुठळी तयार होणे जी फुफ्फुसे व ह्रदयाकडे जाऊ शकते.

इकॉनॉमी क्लास सिंड्रोम काय आहे?

प्रवासामध्ये खूप वेळ बसून राहिल्यामुळे अनेकदा व्हेरिकोज व्हेन्स वाढतात. विमानातील निष्क्रियतेसह जेव्हा शिरांच्या भिंती जर कमजोर असतील तर त्यामुळे 'इकॉनॉमी क्लास सिंड्रोम' होऊ शकतो किंवा पायाच्या खालच्या भागांमध्ये सुपरफिशिअल व्हेनस प्रणालीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. 30,000 फूटांवर पाय निरोगी राखण्यासाठी, विमानात करण्याच्या व्यायामांचा सराव करा, जसे की बसल्या बसल्या घोट्यातून पाय फिरवणे, मधल्या जागेमध्ये चालणे, उभे राहून टाचा उंचावणे.

व्हेरिकोज व्हेन्सच्या काही गुंतागुंती आहेत का? जर उपचार केले नाहीत तर काय समस्या होऊ शकतात?

व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या बहुतांश लोकांमध्ये गुंतागुंत निर्माण होत नाही. कोणाला गुंतागुंत विकसीत होईल आणि कोणाला नाही याचे अनुमान लावणे अशक्य आहे. व्हेरिकोज व्हेन्सचे डोळ्यांना दिसणारे आकारमान हे गुंतागुंत विकसीत होईल का याच्याशी संबंधित नाही:
सुपरफिशिअल थ्रम्बोफ्लिबिटिस - म्हणजे व्हेरिकोज व्हेनमध्ये रक्ताची गुठळी तयार होणे. त्यामुळे लाली, वेदना होतात आणि तो भाग हळवा होतो. ती खूप जास्त व्यापक नसेल आणि खोल शिरांच्या सांध्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती धोकादायक नाही. अशा प्रकारची गुठळी सुटून फुफ्फुसांपर्यंत जाण्याची शक्यता नसते (जशी खोल शिरेमधील जाऊ शकते). असे घडणे असामान्य आहे.
रक्तस्त्राव - जर व्हेरिकोज व्हेनवर अतिशय पातळ त्वचेचे आवरण असेल तर, किरकोळ इजांमुळेही रक्तस्त्राव होऊ शकतो. हे तीव्र असू शकते आणि त्यासाठी रुग्णालयात आपात्कालीन भरती करावी लागू शकते.

तुम्हाला अनेक वर्षांपासून व्हेरिकोज व्हेन्स असतील तर, या स्थिती उद्भवू शकतात:
व्हेनस एक्झिमा - मोठ्या व्हेरिकोज व्हेन्स किंवा घोट्याभोवती हे घडू शकते. त्यामुळे त्वचा कोरडी, लाल होऊन भेगा पडतात आणि खाज सुटते
व्हेनस पिगमेंटेशन - म्हणजे घोट्याभोवतीच्या त्वचेवर तपकिरी डाग पडणे. शिरेतील थोड्याशा रक्ताची त्वचेमध्ये गळती झाल्यामुळे हे घडते
लिपोडर्मेटोक्स्लेरोसिस - ही पिगमेंटेशनची पुढची स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेखालील मेद घट्ट होतो आणि त्वचा कडक व सुजलेली लागते. किरकोळ इजेनंतरही अल्सर तयार होण्यासाठी तुटण्याचा धोका उच्च असतो.
व्हेनस अल्सरेशन - घोट्यापाशी अल्सर.
लक्षात ठेवा पायांमध्ये, खास करून पोटऱ्यांमध्ये अचानक वेदना होणे आणि त्यांचा रंग बदलला असल्यास त्यावर त्वरित उपचार केले जावे कारण हे डीप व्हेन थ्रम्बोसिसचे सूचक असू शकते.

मला व्हेरिकोज व्हेन्ससाठी उपचार आवश्यक आहेत का?

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4