रक्तवाहिन्या कशा काम करतात

रक्ताभिसरण संस्था

पेशींना प्राणवायू पोहोचविण्याची जबाबदारी रक्ताभिसरण संस्थेची असते. यामध्ये ह्रदय, रोहिण्या, निला, केशवाहिन्या आणि रक्त यांचा समावेश होतो. ह्रदयाच्या पंपिंगच्या कृतीमुळे प्राणवायूयुक्त रक्त रोहिण्या आणि केशवाहिन्यांद्वारे ह्रदय आणि फुफ्फुसांकडून संपूर्ण शरीरातील लाखो पेशींपर्यंत पोहोचवले जाते. रक्त उतींमधून पुढे जात असताना, ते शिरांमधून गोळा केलेला प्राणवायू आणि अन्न पेशींना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. त्यानंतर शिरांद्वारे हे रक्त ह्रदयाकडे परत येते.
ह्रदय मोठ्या दाबाने रोहिण्यांद्वारे रक्त पंप करते, ज्यायोगे ते चटकन पायांपर्यंत व इतर उतींपर्यंत पोहोचावे.
तथापि पायामध्ये गेलेले रक्त परत आणणे सोपे नसते. पायामध्ये "ह्रदय" नसते त्यामुळे रक्त परत ह्रदयाकडे आणण्यासाठी शरीराला भिन्न मार्ग लागतो.

रक्ताभिसरण संस्था

उभे राहणे

जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा ह्रदय पायांच्या वरच्या बाजूला जाते. त्यामुळे रक्तातील दबाव वाढतो कारण ह्रदयापासून ते पायापर्यंत रक्ताच्या स्तंभाचे वजन त्यावर येते. याला "गुरुत्वाकर्षणीय" किंवा "हायड्रोस्टॅटिक" दबाव म्हणतात.
उभे राहण्यामुळे जो अतिरिक्त दबाव येतो त्यामुळे रक्त ह्रदयापासून रोहिण्यांमध्ये वाहण्यास मदत होते. परंतु, याच "गुरुत्वाकर्षणीय" किंवा "हायड्रोस्टॅटिक" दबावाचा अर्थ म्हणजे ह्रदयाकडे परत जाण्यासाठी शिरांतील रक्तामध्ये पुरेसा दबाव नाही.
म्हणूनच ज्या लोकांना स्थिर उभे राहावे लागते (जसे की संचलनातील सैनिक) ते भोवळ येऊन पडतात. त्यांना त्यांच्या पायांतील रक्त मिळत नाही आणि ते मेंदूपर्यंत पंप करता येत नाही व परिणामी त्यांना भोवळ येते.
हे होण्यास थांबविण्यासाठी, पायांतून रक्त परत ह्रदयाकडे पंप केले गेले पाहिजे.

उभे राहणे

पायाचा पंप किंवा स्नायूचा पंप किंवा "परिधीय हृदयाचे" कार्य

आपण उठून बसलो किंवा उभे राहिलो तर आपल्याला भोवळ येत नाही ही वस्तुस्थिती दर्शवते की रक्त सहसा ह्रदयाकडे परत जाते. पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षणाचा दबाव खाली ढकलत असताना, ते घोटे आणि पायाच्या खालच्या भागांतून परत ओटीपोटाकडे पंप केले गेले पाहिजे जिथून ते श्वसनाच्या मदतीने परत ह्रदयाकडे जाण्यास मदत होऊ शकते. परिधीय ह्रदय ही पोटऱ्या व पायांतील स्नायू, शिरा आणि झडपांची एक अशी संस्था आहे जी ऑक्सिजन काढून घेतलेले रक्त परत ह्रदय व फुफ्फुसांकडे ढकलण्यास मदत करते. शिरांमध्ये एकतर्फी झडपा असतात ज्या पायाच्या बोटांकडून ह्रदयाकडे जाणारे रक्त परत उलटण्यास प्रतिबंध करतात. स्नायूच्या प्रत्येक आकुंचनासह उघडणाऱ्या आणि स्नायू शिथील झाल्यावर बंद होणाऱ्या या झडपा पिंजऱ्याच्या दारांसारखे काम करतात आणि रक्त उलट दिशेने वाहण्यास प्रतिबंध करतात.
पायाकडून ओटीपोटाकडे रक्त परत पंप करण्यासाठी पायाचा पंप दोन घटकांवर अवलंबून असतो:

पायाचा पंप किंवा स्नायूचा पंप किंवा "परिधीय हृदयाचे" कार्य

हालचाल

पायांतील स्नायूंची हालचाल शिरांवर दाब देते आणि त्यांना पिळते. या हालचालींपैकी सर्वात महत्त्वाची हालचाल म्हणजे पोटरीच्या स्नायूंद्वारे घोट्याचे सांधे हलवले जाणे.
पोटरीच्या स्नायूंद्वारे घोट्याचे सांधे हलवले जाणे उजवीकडील चित्रात दिसते – स्नायूचे आकुंचन झाल्यावर तो शिरेला कसा पिळतो ते पाहा.

हालचाल

झडपा – शीरांमध्ये असलेल्या

शिरांना पिळणाऱ्या स्नायूंच्या दबावामुळे रक्त पुढे ढकलले जाते. परंतु झडपा नसतील तर रक्त दिशाहीन वाहते आणि पायांमधून रक्त पंप केले जात नाही. झडपांमुळे असे रक्त उलट वाहण्यास जो प्रतिबंध होतो त्यामुळेच सामान्य माणसांमध्ये शिरांद्वारे पायांचे संरक्षण केले जाते. झडपा काम करत असतात तेव्हा शिरा "सक्षम”आहेत असे म्हणले जाते. जेव्हा झडपा सदोष किंवा कमजोर बनतात तेव्हा त्या योग्यप्रकारे कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे, दुसरे ह्रदय भरून वाहून जाते आणि रक्त शिरांमध्ये साठून राहते.

शिरांमध्ये झडपाच नसत्या परंतु स्नायू सामान्यपणे आकुंचन पावले असते तर काय झाले असते ते उजवीकडील चित्रात दिसते.
पायांमध्ये शिरांच्या 2 प्रणाली काम करतात: खोल प्रणाली आणि वरवरची प्रणाली. खोल प्रणालीमध्ये मोठ्या शिरांचा समावेश होतो ज्या साधारण 1 इंच व्यासाच्या असतात आणि हाडाच्या अगदी जवळ असून, त्यांच्या भोवती स्नायू असतात. वरवरच्या प्रणालीमध्ये त्वचेच्या पृष्ठभागावर थेट दिसणाऱ्या शिरांचा समावेश होतो. या प्रणाली 2 जंक्शन्सवर आणि प्रक्षेपक नावाच्या जोडणाऱ्या शिरांच्या मालिकांद्वारे परस्परांना भेटतात. शिरांतील 90% रक्त शीरांच्या खोल प्रणालीद्वारे परत ह्रदयाकडे पाठवले जाते आणि 10% शीरांच्या वरवरच्या प्रणालीद्वारे पाठवले जाते.

झडपा – शीरांमध्ये असलेल्या

वरवरच्या प्रणालीमध्ये दोन प्रमुख प्रणाली असतात

द ग्रेट सफेनस व्हेन: हिचा प्रारंभ घोट्याच्या आतील बाजूला होतो आणि मांडीच्या सांध्याकडे वर जाते जिथे ती खोल शिरांना जोडली जाते. या बिंदूला, येथे एक महत्त्वाची एकमार्गी शिरेची झडप असते, जिला सफेनो फेमोरल झडप म्हणतात. जर या झडपेमध्ये गळती होऊ लागली तर, द ग्रेट सफेनस व्हेनमध्ये रक्त जमा होऊ लागते आणि तिच्या लांबीच्या बाजूने विस्तार वाढू लागतो.

द शॉर्ट सफेनस प्रणाली: पायातील ही वरवरची शीर घोट्याच्या बाहेरील बाजूने सुरू होते आणि वरच्या दिशेने गुडघ्याच्या मागील बाजूला जाते, जिथे ती खोल शिरांमध्ये प्रवेश करते. या बिंदूला सफेनो पॉपलिटीअल झडप नावाची एक शिरेची झडप असते. या झडपेमध्ये गळती झाल्यास शॉर्ट सफेनस शिरेचा विस्तार होतो.

परफोरेटर शिरेच्या झडपा

पायाच्या विविध स्तरांवर, वरवरच्या शिरा आणि खोल शिरा यांच्यामध्ये संवाद साधणाऱ्या लहान शिरा असतात. यांना परफोरेटर शीरा म्हणतात आणि त्यांच्यामध्ये परफोरेटर झडप असते, ज्यामुळे रक्त वरवरच्या प्रणालीतून खोल प्रणालीमध्ये वाहू शकते. जर या झडपेमध्ये गळती झाली तर, रक्त थेट खोल शिरांमधून वरवरच्या शिरांमध्ये वाहात जाते. व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या रुग्णांच्या घोट्यांभोवती दिसत असलेल्या पिगमेंटेशनचे सामान्य कारण असते. या शिरा त्वचेला लंब असतात, त्यामुळे विस्तारलेल्या शिरा दिसून येतात.

परफोरेटर शिरेच्या झडपा

पायातील पंप – असामान्य झडपांमुळे बंद पडणे

जेव्हा शिरांमधील झडपा काम करत नाहीत तेव्हा त्यांना "अक्षम”म्हणले जाते. स्नायू शिरांना पिळतात आणि शिरेमध्ये रक्त वर व खाली ढकलले जाते, जसे की सामान्य शिरांमध्ये घडते. तथापि, जेव्हा हा दाब मुक्त होतो आणि शिरा उघडतात तेव्हा रक्त परत पायाकडे जाऊ दिले जाते कारण झडपांना त्यास प्रतिबंध करता येत नाही. याला शिरांचे “रिफ्लक्स” (रक्त मागे उलटणे) म्हणतात. तसे पाहता शिरांच्या विकाराशी निगडीत प्रत्येक समस्या, अर्थात, व्हेरिकोज व्हेन्स, पाय दुखणे, व्हेनस एक्झिमा, लिपोडर्माटोस्क्लेरोसिस आणि पायाच्या शिरांमधील अल्सर्स हे पायातील पंप निकामी होण्याशी आणि त्यानंतरच्या शिरेच्या रिफ्लक्सशी संबंधित आहेत.

Functioning Valves in Veins

Leg Pump with No Valves

Failing Valves

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4