हे खरे आहे का?

पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक वरचेवर व्हेरिकोज व्हेन्स होतात.

शास्त्रीयदृष्ट्या बोलल्यास, शिरा आणि केशवाहिन्या इस्ट्रोजेनला जास्त संवेदनशील असतात आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांना व्हेरिकोज व्हेन्स, कोळ्याच्या जाळ्यासारख्या शीरा असण्याची शक्यता जास्त आहे.
व्हेरिकोज व्हेन्स स्त्रियांमध्ये तिप्पट जास्त सामान्य आहेत

गर्भधारणेमुळे झालेल्या व्हेरिकोज व्हेन्स.

गर्भधारणेमुळे व्हेरिकोज व्हेन्स होत नाहीत, परंतु तुमच्या शिरांच्या झडपा जर कमकुवत असतील तर, गर्भधारणेदरम्यान त्यांच्यात गळती होऊ शकते आणि गर्भधारणेदरम्यान या शिरा जास्त ठळकपणे दिसू लागतात. बहुतांश प्रकरणांमध्ये, या विस्फारलेल्या शिरा प्रसुतीनंतर गायब होतात. बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत हे खरे आहे.
तथापि वारंवार गर्भधारणा झाल्यामुळे शिरांच्या झडपांना अधिक नुकसान पोहोचते आणि त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सची तीव्रता वाढते.

व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या 405 स्त्रियांवरील अभ्यास

शिरा दुरुस्त करून घेण्यापूर्वी कुटुंब वाढविण्यासाठी तुम्ही थांबलं पाहिजे.

वर नमूद केल्यानुसार, गर्भधारणेमुळे व्हेरिकोज व्हेन्स होत नाहीत, परंतु त्या बिघडतात. त्यामुळे जितक्या लवकर शिरा दुरुस्त केल्या जातील:

व्हेरिकोज व्हेन्स फक्त दिसायला वाईट दिसतात आणि त्या तशाच राहिल्या तरी ते सुरक्षित असते.

हे सत्य नाही. अगदी सूक्ष्म स्पायडर व्हेन्समुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो जसे की मांड्यांची जळजळ आणि बधीर होणे. हे सहसा शिरांच्या बाजूला असलेल्या लहान नसांचा क्षोभ होण्यामुळे घडते. असे दिसून आले आहे की स्क्लेरोथेरपी नावाच्या उपचारांनी स्पायडर व्हेन्सवर उपचार केल्यास अनेक रुग्णांना ठळकपणे आराम मिळतो. यांपैकी अनेक स्पायडर व्हेन्स अंतर्निहित परफोरेटर शिरांशी जोडलेल्या असतात आणि दीर्घकाळ आराम मिळण्यासाठी त्या सुद्धा बंद करणे आवश्यक आहे.

अनेक रुग्णांना मोठ्या व्हेरिकोज व्हेन्समुळे वेदना किंवा त्रास होत नाही. तथापि, कालांतराने, या शिरांवरील दबाव वाढल्यामुळे त्या गडद होतात आणि घोट्याभोवतीच्या त्वचेवर पिगमेंटेशन होते, त्वचा कोरडी पडते व खाज सुटते आणि त्यामुळे भरून न येणाऱ्या जखमा होऊ शकतात ज्यांना अल्सर्स म्हणतात.

काही प्रकरणांमध्ये, या मोठ्या शिरांमधील स्थिर रक्ताची गुठळी होऊ शकते (थ्रम्बोसिस). एक लहानशी गुठळी सुटून ह्रदयाच्या उजव्या बाजूमधून फुफ्फुसांपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे पल्मनरी एम्बोलिझम नावाची जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. कधीकधी ही गुठळी पायांच्या खोल शिरांमध्ये जाऊन, डीप व्हेन थ्रम्बोसिस होऊ शकतो. त्यामुळे, व्हेरिकोज व्हेन्सकडे दुर्लक्ष करू नये!

दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स होतात.

दीर्घकाळ स्थिर उभे राहिल्यामुळे कदाचित व्हेन्सची समस्या होत नसावी (तसे असते तर, भारतीय लष्करातील बहुतांश लोकांना व्हेरिकोज व्हेन्स झाल्या असत्या). तथापि, जर पायाचा अंतर्निहित पंप बंद पडला असेल किंवा तुमच्या पायाच्या झडपा कमकुवत झाल्या असतील तर दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे दोन्ही लक्षणे निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि व्हेरिकोज व्हेन्स बिघडण्याचा वेगही जास्त असू शकतो.

हालचाल न करण्यामुळे शिरांचे आजार बळावतात

व्हेरिकोज व्हेन्स कुटुंबांमध्ये असतात (अनुवांशिक)

व्हेरिकोज व्हेन्स बाबतची ही "सामान्यपणे ज्ञात" वस्तुस्थिती आहे जी खरी असल्याचे दिसते. व्हेरिकोज व्हेन्स आनुवंशिक असतात. तथापि, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व्हेरिकोज व्हेन्स होतीलच असे नाही. तसेच, तुमच्या कुटुंबातील कोणालाही अजिबात व्हेरिकोज व्हेन्स नसतील तरीही, तुमच्या पायाचा पंप निकामी होऊ शकतो, झडपा निकामी होऊ शकतात आणि व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतात.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4