लेसर उपचार

"लेसर" या संज्ञेचा अर्थ उत्तेजित रेडिएशनच्या उत्सर्जनाद्वारे प्रकाश प्रवर्धन या तंत्रामध्ये व्हेरिकोज व्हेन्स बंद करण्यासाठी उष्णतेची उर्जा वापरतात. उष्णतेची उर्जा एका खास यंत्राद्वारे निर्माण केली जाते आणि "डिओड लेसर" तंतूंद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचवली जाते.

व्हेरिकोज व्हेन्सच्या उपचाराच्या या एंडोव्हेनस लेसर पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेतील कापणे व व्रण टाळले जातात आणि लोकल ऍनेस्थेशियांतर्गत पार पाडली जाते. हे तंत्र वापरून बहुतांश प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करता येतात.

The Laser fiber into the veins

The Bioletic Laser Machine

जेव्हा शिरेमध्ये लेसर उर्जा पोहोचवली जाते तेव्हा, शिरेतील रक्तामध्ये असलेल्या पाण्याद्वारे उष्णतेची उर्जा निवडकपणे शोषली जाते आणि त्यामुळे शिरेच्या आतील अस्तराला (इंटिमा) नुकसान होऊन शिरा संकुचित होऊन बंद होतात. नंतर फायब्रॉसिसच्या प्रक्रियेमुळे शीर कायमस्वरूपी बंद होते आणि राहून गेलेल्या शरीराच्या यंत्रणेद्वारे काढल्या जातात, ज्यायोगे ठराविक कालावधीनंतर कोणतीही शीर अजिबात दिसत नाही.

व्हेरिकोज व्हेन्सच्या उपचाराचे लेसर तंत्र :

1. ज्या व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करायचे आहेत त्यांचे मूल्यमापन प्रथम डॉपलर अल्ट्रासाउंड चाचणी या सोनोग्राफी चाचणीने केले जाते.

2. त्यानंतर शिरेच्या मार्गाची त्वचेवर खूण केली जाते.The course of the vein is then marked onto the skin.

3. शिरेमध्ये जिथे सुई टोचली जाते तिथून स्थानिक ऍनेस्थेशिया दिला जातो. अल्ट्रासाउंड मार्गदर्शनाखाली शिरेमध्ये सुई सरकवली जाते, जशी रक्त घेण्याच्या प्रक्रियेमध्ये शिरेत सुई टोचली जाते.

4. सुईद्वारे एक मार्गदर्शक वायर शिरेतून आणि कॅथेटर नावाच्या एका प्लास्टिकच्या नळीतून ओवली जाते. या पोकळ कॅथेटरद्वारे, तो पातळ लेसर तंतू शिरेमध्ये पुढे सरकवला जातो; ही संपूर्ण प्रक्रिया सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाने केली जाते.

5. शिरेतील लेसर तंतूच्या स्थितीची लेसर तंतूच्या टोकाला असलेल्या लाल दिव्याद्वारे पुष्टी केली जाते जो त्वचेतून जाताना चमकतो.

6. आता, भरपूर प्रमाणात ट्युमसेंट ऍनेस्थेशिया नावाचे विद्राव्य ऍनेस्थेशिया द्रावण शिरेच्या संपूर्ण मार्गामध्ये टोचले जाते. पातळ सुयांद्वारे आणि अल्ट्रासाउंड मार्गदर्शनाखाली हे केले जाते. हे ऍनेस्थेशिया द्रावण संपूर्ण शिरेभोवती टोचले जाते, ज्यायोगे शिरेच्या आतील लेसर तंतूभोवती ती शीर संकुचित होईल. तसेच, शिरेभोवती असलेल्या ऍनेस्थेशिया द्रावणाच्या थरामुळे उष्णतेची उर्जा शिरेमधून आसपासच्या रचनांमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो.

7. लेसर तंतू आता लेसर यंत्राला जोडला जातो आणि शिरेमध्ये लेसर उर्जा पोहोचवली जाते. यामुळे शीर त्वरित बंद होते, जे अल्ट्रासाउंड प्रतिमेमध्ये दिसते. लेसर तंतू हळूहळू काढून घेतला जातो आणि शिरेची संपूर्ण लांबी बंद केली जाते.

8. संकुचित झालेल्या शिरांच्या स्वरूपात, अंतिम निकाल जवळजवळ त्वरित दिसतात.

9. प्रक्रियेच्या शेवटी शिरेमधून कॅथेटर काढले जाते आणि केवळ एक लहान टोचलेली खूण राहते. काही दिवसांमध्ये ही जखम भरून येते.

10. प्रक्रियेच्या शेवटी उपचार केलेल्या पायावर एक कॉम्प्रेशन बँडेज किंवा स्टॉकिंग घातला जातो आणि रुग्णाला 15 ते 20 मिनिटे चालवले जाते. बहुतांश रुग्णांना दुसऱ्या दिवसापासून सामान्य कामे आणि वाहन चालविणे करता येते.

व्हेरिकोज व्हेन्ससाठी रेडिओफ्रिक्वेन्सी ऍब्लाशन

आरएफए(RFA) वापरून व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्याचे मुलभूत तत्व लेसरसारखेच असते. शिरा बंद करण्यासाठी थर्मल (उष्णतेची उर्जा) वापरणे. या तंत्रामध्ये रेडिओफ्रिक्वेन्सी तरंगांद्वारे उष्णता निर्माण केली जाते आणि विशेष आरएफए (RFA) कॅथेटरद्वारे शिरांमध्ये उर्जा पोहोचवली जाते. उपचाराचे तंत्र हे लेसर उपचारांसारखेच असते.

दुष्परिणाम

लेसर ऍब्लाशन पद्धत सहन करणे सुसह्य असते आणि तिचे अगदी मोजके दुष्परिणाम आहेत. अशाप्रकारे उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर त्वरित सामान्य हालचाली सुरू करता येतात. काही रुग्णांना संकुचित शिरांपाशी किंचीत वेदना जाणवू शकतात, ज्यासाठी स्थानिक थंडावा देणारे आणि दाहरोधक मलम झटपट आणि खात्रीलायक आराम देते. अगदी दुर्मिळपणे तिथे रक्ताची गुठळी तयार होते.
लहान टॅलेंजिस्टेस्शिया (केशवाहिन्यांचे जाळे) आणि कोळ्याच्या जाळ्यासारख्या शिरांवर उपचार करण्याबरोबरच लांब आणि खूड सफेनस शिरांच्या अक्षमतेमुळे तसेच कडेच्या आणि जाळीदार शिरांमुळे बनणाऱ्या व्हॅरिसेजवर (काळसर निळसर रंगाच्या रक्तवाहिन्यांच्या गाठी) उपचार करण्यासाठीही लेसर उपचार अनुरूप असतात.
“स्ट्रिपिंग” नावाच्या शिरांवरील पारंपारिक उपचार पद्धतींच्या तुलनेत लेसर ऍब्लाशन तंत्रामध्ये विविध फायदे आहेत: यामध्ये काट छाट कमीत कमी असते आणि त्यामुळे इष्टतम कॉस्मेटिक प्रभाव आणि उत्कृष्ठ खात्रीलायक निकालांसह शारीरिक त्रासाची प्रक्रिया कमीत कमी असते: रुग्ण उपचारांसाठी चालत येतो/ते आणि एका तासामध्ये आपल्या व्हॅरिसेजच्या समस्यांवर उपचार करून चालत बाहेर पडतो/ते!

लेसर प्रक्रियेची शस्त्रक्रियेशी तुलना

लेसर शस्त्रक्रिया
1.बाह्यरुग्ण प्रक्रिया(ओपीडी) 1. रुग्णालयातील प्रक्रिया
2.लोकल ऍनेस्थेशिया 2. जनरल ऍनेस्थेशिया
3. एक तासाची प्रक्रिया 3. तीन – चार तासांची प्रक्रिया
4. आरामाची गरज नाही 4. एक आठवडा आराम
5. त्याच दिवशी पुन्हा कामाला लागता येते 5. दोन किंवा तीन आठवड्यांनंतर कामाला लागता येते
6. दीर्घावधीतील पुनरुद्भव 2-4% आहे 6. दीर्घावधीतील पुनरुद्भव 20- 40% आहे
7. परवडणारी 7. महाग

ग्रेट सफेनस व्हेनच्या व्हेरिकोज व्हेन्स लेसर उपचारांच्या केस स्टडीज

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4