उपचाराच्या पद्धती

व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. विशिष्ठ प्रक्रिया किंवा प्रक्रियांचे मिश्रण हे स्थितीच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपचारांच्या काही पर्यायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

एंडोव्हेनस लेसर

काही प्रकरणांमध्ये, अंतर्निहित शिरेच्या विकारावर उपचार करण्यासाठी एकाच ठिकाणी सुई टोचून किंवा पाव इंचाहून कमी छेद देऊन, प्रगत अल्ट्रासाउंड मार्गदर्शक लेसर तंत्रज्ञानाने उपचार केले जातात. कधीकधी याचा संदर्भ एंडोव्हेनस लेसर किंवा “एंडोलेसर” असा दिला जातो, या दृष्टिकोनामुळे शिरेच्या अशा विकारावर उपचार करतात येतात ज्यासाठी पूर्वी मोठा छेद देऊन कापून काढावे लागत असे. अल्ट्रासाउंड मार्गदर्शक शिरेच्या उपचार पद्धतीमधील आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे आमच्या रुग्णांना ही अल्ट्रासाउंड मार्गदर्शक लेसर पद्धत देऊ करण्यामध्ये आम्ही अद्वितीयरित्या पात्र ठरतो. ही प्रक्रिया कार्यालयामध्ये पार पाडली जाऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा!!

पारंपारिक उपचार

जेव्हा सौम्य लक्षणांसह रुग्णाला सौम्य व्हेरिकोज व्हेन्स असतात तेव्हा, लक्षणांपासून सुटका मिळवण्यासाठी तोंडी औषधे आणि विशेष कम्प्रेशन स्टॉकिंग्ज उपयोगी ठरू शकतात. तथापि, एक लक्षात ठेवले पाहिजे की व्हेरिकोज व्हेन्स ही वाढत जाणारी स्थिती आहे आणि त्यामुळे औषधोपचार आणि स्टॉकिंग्ज वापरूनही आजाराच्या स्थितीची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे तुमच्या फिजिशियनकडे नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.

अ) औषधोपचार:

विविध प्रकारची औषधे दिली जातात ज्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत. सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे म्हणजे हॉर्स चेस्टनट ट्री बार्क, हे काउंटरवर सहज मिळते. कोळ्याच्या जाळ्यासारख्या शिरा झालेल्या असतील त्यांची जळजळ आणि घोट्यावरील सूज यामुळे कमी होते.

सर्वात व्यापकपणे अभ्यास केले जात असलेले औषध म्हणजे MPFF (मायक्रोनाइज्ड प्युरिफाईड फ्लॅवेनॉइड फ्रॅक्शन), डॅफलॉन म्हणून उपलब्ध. अनेक स्वैरीकृत परीक्षणांमध्ये यामुळे थकवा आणि पायाच्या वेदनेची लक्षणे कमी होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे, तसेच घोट्यावरची सूज कमी होते आणि व्हेरिकोज अल्सरची सुरुवात असल्यास ते लवकर बरे होतात. तथापि, हे औषध तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते असे ठरवणाऱ्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन यासाठी आवश्यक असते.

ब) ग्रॅज्युएटेड कम्प्रेशन स्टॉकिंग्ज:

व्हेरिकोज व्हेन्सच्या प्रारंभी उपचारांची मुख्य पद्धत म्हणून स्टॉकिंग्ज वापरले जातात. त्यामुळे पायातील वेदना आणि पेटक्यांसारखी लक्षणे दूर होण्यास मदत होतेच, परंतु त्याचबरोबर व्हेरिकोज व्हेन्सच्या तीव्रतेचा दर कमी होण्यासही मदत होते.

क) नियमित व्यायाम:

नियमितपणे चालण्याने किंवा पळण्याने पोटऱ्यांतील पंप सक्रिय होतो आणि शिरांमधील रक्त रिकामे होऊन परत ह्रदयाकडे जाण्यास मदत होते.
1. वेदना आणि चमका येण्यासारखी लक्षणे कमी होतात
2. वारंवार अल्सर होणे कमी होते
3. सुपरफिशियल फ्लेबियाटिस आणि डीव्हीटी(DVT)च्या वेगाचे निवारण होते
4. दररोज 30 मिनिटे उत्तम
5. कोणतीही टोकाची गोष्ट करणे कमी केल्यास मदत होते (जड वजन उचलणे किंवा खूप श्रमाच्या कामांपासून दूर राहावे)

स्क्लेरोथेरपी

हे एक असे तंत्र आहे ज्यामध्ये थोड्या प्रमाणात औषधे थेट व्हेरिकोज व्हेन्समध्ये टोचली जातात. स्क्लेरोसंट औषधाचे आम्लीय स्वरूप आतील शिरेच्या झडपेवर कार्य करते, ज्यामुळे शिरेचे आकुंचन होते आणि त्यानंतर शीर बंद होते. ज्या शिरेवर उपचार करायचा आहे तिच्या व्यासानुसार, स्क्लेरोसंट औषध विविध तीव्रतेमध्ये वापरता येते. ते द्रव स्वरूपात टोचता येते किंवा हवा किंवा कार्बन डाय ऑक्साईड वापरून फेस तयार करून वापरता येते. थेट पाहून किंवा अधिक खोल शिरा असतील तेव्हा अल्ट्रासाउंडच्या मार्गदर्शनाखाली ते बारीक सुयांद्वारे शिरांमध्ये टोचले जाते.
सामान्यपणे वापरली जाणारी औषधे आहेत सोडियम टेट्राडेसील सल्फेट किंवा पॉलिडोकानोल.

फोम स्क्लेरोथेरपी

द्रव स्वरूपामध्ये स्क्लेरोसिंग घटक वापरण्याऐवजी, या तंत्रामध्ये फोम स्क्लेरोसिंग द्रावण असते. फोम स्क्लेरोथेरपी मागील तत्व हे शेविंग क्रीमला प्रभावी बनवण्यामागील तत्वासारखेच आहे: द्रवापेक्षा फेसाचे पृष्ठभाग क्षेत्र जास्त मोठे असते, ज्यामुळे तो त्याच्या लक्षित पृष्ठभागावर चिकटण्याची शक्यता वाढते. फोम स्क्लेरोथेरपीमुळे शिरेचा क्षोभ होतो आणि लिक्विड स्क्लेरोथेरपीपेक्षा ती जास्त चटकन आकुंचन पावते.

सर्जिकल लिगेशन आणि स्ट्रिपिंग

सर्जिकल स्ट्रिपिंग केवळ अतिशय तीव्र अशा 10% व्हेरिकोज व्हेन्स प्रकरणांसाठी राखून ठेवलेले असते. मांडीच्या सांध्यासून ते घोट्याकडे जाणारी मुख्य खोल शीर (लांब सफेनस शीर) काढण्यासाठी हे वापरतात. यामध्ये केवळ त्वचेतीलच रक्त संकलित केले जाते. ही शीर काढण्यामुळे पायातील रक्ताभिसरणावर परिणाम होत नाही, कारण मोठ्या प्रमाणातील रक्त हे पायातील खोल शिरांमध्ये असते. व्हेरिकोज व्हेन्सच्या उपचारांसाठी व्हेन्स स्ट्रिपिंग ही सर्वात जुनी पद्धत आहे. 100 वर्षांपूर्वी याची पहिली शस्त्रक्रिया पार पाडली गेली. पायातील विकार झालेल्या शिरा शोधण्यासाठी पायामध्ये चिरा दिल्या जातात. या सखोल शिरांमधून विविध डिझाईनचे लांब "स्ट्रिपर्स" सोडले जातात आणि मग ते स्ट्रिपर आणि शीर पायातून एकत्रितपणे बाहेर खेचले जातात. बहुतेकदा जनरल ऍनेस्थेशिया देऊन (रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध करून आणि व्हेंटिलेटरला संलग्न करून) हे केले जाते कारण यामध्ये उतींमुळ बसणारा धक्का समाविष्ट असतो. जनरल ऍनेस्थेशिया द्यावा लागत असल्यामुळे ही शस्त्रक्रिया रुग्णालयात किंवा शस्त्रक्रियेची सुविधा असलेल्या तत्सम ठिकाणी केली जाते. पृष्ठभागावरील शिरा सहसा एकाचवेळी काढल्या जातात ज्यासाठी प्रत्येकी 1 ते 4 इंचांचे अनेक छेद दिले जातात. बरे होण्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात बदलू शकतो, परंतु सहसा तो दोन किंवा चार आठवड्यांचा असतो.

व्हेरिकोज व्हेन्ससाठीच्या 2 मुख्य प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत

1. मिनि-फ्लेबेक्टॉमी
2. अँब्युलेटरी किंवा चल शस्त्रक्रिया
मिनि-फ्लेबेक्टॉमी ही सूक्ष्म छेद देऊन शिरेचा सदोष भाग काढण्यासाठी स्थानिक ऍनेस्थेशिया देऊन केली जाणारी एक कार्यालयात होणारी प्रक्रिया आहे. मांडीच्या साध्यांमध्ये आणि घोटा किंवा गुडघ्यापाशी दोन लहान छेद देऊन सफेनस शीर काढण्यासाठी अँब्युलेटरी किंवा चल शस्त्रक्रिया रुग्णालयात केली जाते.

शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम

शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी व्रण राहू शकतात. गंभीर दुष्परिणाम असामाईक आहेत.
तथापि, जनरल ऍनेस्थेशियासह ह्रदयाशी व श्वसनाशी निगडीत गुंतागुंतींची जोखीम नेहमीच असते.
रक्तस्त्राव आणि रक्ताधिक्य ही एक समस्या असू शकते, परंतु संकलित रक्त सहसा आपले आपण निवळते आणि त्यासाठी उपचारांची गरज भासत नाही. जखमेमध्ये संक्रमण होणे, दाह, सूज आणि लाली येऊ शकते.
एक अतिशय सामान्य गुंतागुंत म्हणजे शिरांभोवतीचे तंतू खराब होणे, ज्यामुळे वेदना होऊ शकते.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4