आमचा संघ

6 जानेवारी 2003 रोजी आमच्या फिजिशियन्सनी कागदोपत्री नोंद झालेले देशातील पहिले व्हेरिकोज व्हेन्सचे लेसर उपचार जसलोक रुग्णालयामध्ये केले. आमच्या हजारो रुग्णांना लेसर, रेडिओफ्रिक्वेन्सी ऍब्लाशन आणि फोम स्क्लेरोथेरपी यांसारख्या व्हेरिकोज व्हेन्सच्या गैर शल्यक्रियात्मक उपचार पद्धतीचा फायदा झाला आहे. संपूर्ण देशातून आणि 30 हून जास्त देशांतील रुग्णांनी व्हेरिकोज व्हेन्सबाबत तज्ज्ञांचे मूल्यवान मत आणि उपचार घेण्यासाठी डॉक्टर हाऊस व्हेन केअर सेंटरला भेट दिली आहे. आमच्या केंद्रावर, प्रत्येक रुग्णाचे, त्याच्या/तिच्या शिरांच्या स्थितीबाबत बारकाईने मूल्यमापन केले जाते, यामध्ये तपशीलवार चिकित्सिय मूल्यमापन केले जाते व त्यानंतर अल्ट्रासाउंड चाचण्या आणि आवश्यक असल्यास इतर प्रगत तपासण्या केल्या जातात. उपचाराची प्रस्तावित पद्धत ही प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार असते, कारण अनेक रुग्णांना औषधोपचार आणि कम्प्रेशन स्टॉकिंग्जसह पारंपारिक पद्धतींचे व्यवस्थापन आवश्यक असू शकते. ज्यांचा आजार जास्त बळावला आहे किंवा वेदनादायक आहे त्यांना प्रगत उपचार पद्धती घेण्याचा पर्याय दिला जातो. उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पाठपुरावा करण्यासाठी आणि आमच्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आमचे सहाय्यक डॉक्टर आणि परिचारिका (पुरूष व स्त्री) मदत करतात. जसलोक रुग्णालय आणि अपोलो रुग्णालये यांसारख्या प्रमुख रुग्णालयांद्वारे आमचा संघ मान्यताप्राप्त आहे, गरज असल्यास तिथे रुग्णांना दाखल केले जाऊ शकते.

प्रमुख सल्लागार

डॉ. शोएब पडारिया, एमडी डीएम, एक वरिष्ठ कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट, जे 1991 पासून मुंबईच्या जसलोक रुग्णालयामध्ये पेरिफेरल व्हस्क्युलर इंटरव्हेन्शन्स विभागाचे प्रमुख आहेत.

मुंबईतील केईएम रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी युके आणि युएसएमध्ये कार्डिऍक आणि व्हस्क्युलर इंटरव्हेन्शन्समध्ये पुढील प्रशिक्षण घेतले. रोहिणी आणि नीलेच्या आजाराच्या उपचारातील व्यापक अनुभवासह, त्यांनी देशामध्ये व्हेरिकोज व्हेन्सचे एंडोव्हेनस ऍब्लेशन लोकप्रिय केले.

ते व्हेनस असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत आणि त्याचे माजी अध्यक्षही आहेत. एशियन व्हेनस फोरमचेही ते माजी उपाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दोन्ही पातळ्यांवर त्यांनी आमंत्रणावरून व्याख्याने आणि भाषणे दिलेली आहेत.

अमेरिकन कॉलेज ऑफ फ्लेबॉलॉजीचे आंतरराष्ट्रीय सल्लागार सदस्य म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या गव्हर्निंग कौन्सिलसाठीही ते शीरांच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत.

राष्ट्रीय सल्लागार मंडळ

1. डॉ. रावुल जिंदाल, एमएस एफआरसीएस, हे एक वरिष्ठ व्हस्क्युलर सर्जन आणि फोर्टिस रुग्णालय, मोहाली येथे शीरांच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. रोहिणी आणि नीला दोन्ही विकारांतील मोठा अनुभव असलेले डॉ. जिंदाल हे उत्तर भारतातील प्रमुख व रक्तवाहिनी तज्ज्ञ आहेत. सध्या ते व्हेनस असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.

2. डॉ. रामकृष्ण पिंजाला, एमएस, हे हैद्राबादच्या निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये रक्तवाहिनीच्या शस्त्रक्रियांचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. रक्तवाहिन्यांच्या क्षेत्रामध्ये एक प्रख्यात नेतृत्व असलेले डॉ. रामकृष्ण व्हेनस असोसिएशन ऑफ इंडिया आणि व्हस्क्युलर सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आहेत.

आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळ

1. डॉ. मार्क मलोफ, एमबीबीएस एफआरएसीएस, एफआरसीएस हे एक प्रख्यात व्हस्क्युलर सर्जन असून सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे व्हेरिकोज व्हेन्सचे उपचार व प्रॅक्टिस करतात. व्हेरिकोज व्हेन्सच्या व्यवस्थापनातील ते एक अधिकारी व्यक्ती आहेत आणि ऑस्ट्रेलियातील व्हस्क्युलर सोसायटी आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ फ्लेबॉलॉजीमध्ये प्रमुख पदांवर आहेत. त्यांच्या नावे अनेक प्रकाशने असून, शिरांच्या गुंतागुंतीच्या आजारांचे व्यवस्थापन करण्यातील ते एक अधिकारी व्यक्ती आहेत.

अल्ट्रासाउंड टीम

1. डॉ. विजय चावडा : एमबीबीएस, एमडी. व्हेनस डॉपलर तपासण्यांमध्ये खास रस असलेले ते वरिष्ठ रेडिऑलॉजिस्ट आहेत. 1991 पासून, त्यांनी व्हेरिकोज व्हेन्ससाठी अनेक हजार व्हेनस डॉपलर अल्ट्रासाउंड तपासण्या केल्या आहेत आणि या अवघड तपासणीमध्ये प्राविण्य मिळवले आहे.

2. डॉ. अशिता जनानी : एमबीबीएस, एमडी. त्या वरिष्ठ रेडिऑलॉजिस्ट आणि शिरांच्या विकारांचे अल्ट्रासाउंड मूल्यमापन करण्यातील एक तज्ज्ञ आहेत.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4