व्हेरिकोज अल्सर

प्रौढ लोकांमध्ये 1-2% पायांतील अल्सर असतात. बहुतांश प्रकरणांत, पायांतील अल्सर हे व्हेरिकोज व्हेन्स किंवा डीप व्हेन थ्रम्बोसिस या शिरांच्या जुनाट विकारामुळे होतात.
पायाच्या शिरांमधील अल्सर्स हे शिरांमधील रक्ताभिसरणाचा दबाव वाढल्यामुळे असतात, एक तर सुपरफिशियल व्हेनस रिफ्लक्स (व्हेरिकोज व्हेन्स) किंवा डीप व्हेनस रिफ्लक्स (DVT च्या परिणामी) मुळे असतात. पायातील अल्सर्सवर उपचार करण्यासाठी, टिकून राहणाऱ्या दबावासह, योग्य कॉम्प्रेशन उपचार पद्धती आवश्यक आहे. अल्सर योग्यप्रकारे भरून येण्यासाठी अनेक आठवडे हे कॉम्प्रेशन बँडेज बांधणे आवश्यक असू शकते. जर शिरांमधील अल्सर्स असलेल्या रुग्णामध्ये, एक तर वेगळे किंवा परफोरेटर व्हेन रिफ्लक्स असे ठळक सुपरफिशियल रिफ्लक्स असेल तर, या स्थितींवर उपचार करून चांगली सुधारणा करता येते – ज्यामुळे अल्सर बरे होण्याच्या दरात मदत होते.
एंडोव्हेनस लेसर आणि फोम स्क्लेरोथेरपीसह उपचार केल्यामुळे वेगाने बरे होण्यास चालना मिळते.

केस स्टडी #1

या 45 वर्षांच्या स्वयंपाक्याला 3 वर्षांपासून भरून न येणाऱ्या शिरांमधील अल्सर्सचा त्रास होता. त्याचा सफेनो फेमोरल व्हॉल्व अक्षम असल्याचे आढळले ज्यामुळे एकूणच अक्षमता होती आणि ग्रेट सफेनस व्हेन विस्तारलेली होती. त्याच्या घोट्याच्या वरील अनेक परफोरेटर शिरेच्या झडपा देखील अक्षम होत्या. ग्रेट सफेनस व्हेन बंद करण्यासाठी त्याने एंडोव्हेनस लेसर उपचार आणि अक्षम परफोरेटर बंद करण्यासाठी 3% सोडियम टेट्राडेसील सल्फेट वापरून फोम स्क्लेरोथेरपी करून घेतली. नंतर शिरेच्या जखमेवर कॉम्प्रेशन बँडेजसह प्लेरमिन मलम लावले गेले. 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये शिरांमधील अल्सर्स पूर्णपणे बरे झाले. 18 व्या महिन्यातील पाठपुराव्यामध्ये, पुन्हा अल्सर उद्भवलेले नव्हते.

केस स्टडी #2

42 वर्षांच्या दुकानदाराला, दररोज 15 तास उभे राहावे लागत असे, त्याच्या उजव्या पायामध्ये ठळक सुपरफिशियल व्हेरिकोसायटिस विकसित झाला, शेवटी उजव्या मिडिअल मेलोअसच्या वर एक न भरून येणारा अल्सर झाला. कॉम्प्रेशन बँडेज थेरपीने कोणताही फायदा झाल्याचे दिसून आले नाही. विस्फारलेली आणि अक्षम ग्रेट सफेनस व्हेन आणि तिच्याशी निगडीत अक्षम परफोरेटर्स बंद करण्यासाठी शेवटी त्याने एंडोव्हेनस लेसर उपचार घेतले. त्यानंतर जखम भरून येण्यासाठी प्लेरमिन मलम लावण्यास आणि कम्प्रेशन स्टॉकिंग्ज (वर्ग II) वापरण्यास सांगितले गेले. एक महिन्यामध्ये त्याच्या सुपरफिशियल व्हेरिकोसायटिसचे निर्मूलन होऊन अल्सरचे पूर्ण निवारण होऊन तो बरा झाला. आधी अक्षम असलेल्या सर्व परफोरेटर शिरा बंद झाल्याची अल्ट्रासाउंड तपासणीमधून पुष्टी झाली.

केस स्टडी #3

60 वर्षे वयाच्या दुकानदाराला उजव्या पायावर हळूहळू पिग्मेंटेशन होऊ लागले आणि कालांतराने तिथे अल्सर तयार झाला, ज्यावर शक्य तितके सर्व उपचार करूनही तो एक वर्ष बरे होत नव्हता. शेवटी, त्याचे मूल्यमापन केले गेले आणि त्याच्या परफोरेटर शिरेच्या झडपा अक्षम असल्याचे आढळले, त्यांच्यावर एंडोव्हेनस लेसर आणि फोम स्क्लेरोथेरपीने उपचार केले गेले. त्यानंतर, रोज साध्या मिठाच्या पाण्याने जखम स्वच्छ करून त्यावर प्लेरमिन मलम लावले गेले. खालील चित्रामध्ये एक महिन्यात त्याची जखम किती स्पष्टपणे भरून आली ते दिसते.

केस स्टडी #4

या 70 वर्षांच्या गृहस्थांचा उजवा सफेनोफेमोरल व्हॉल्व पूर्ण अक्षम झाला होता आणि ग्रेट सफेनस व्हेनची व्हेरिकोसिटी दिसत होती आणि त्याच्याशी संलग्न परफोरेटर अक्षमतेमुळे उजव्या पायामध्ये मोठा अल्सर विकसित झाला होता. गेल्या 7 महिन्यांपासून असलेल्या या अल्सरचे आकारमान हळूहळू वाढत गेले. अक्षम झडप बंद केल्यावर आणि जीएसव्ही(GSV)चे तसेच अक्षम परफोरेटर शिरांचे एंडोव्हेनस लेसरने विलोपन केल्यानंतर, त्यांना दररोज प्लेरमिन लावून ड्रेसिंग केले गेले. 2 महिन्यांत दिसलेले निकाल खाली दाखवले आहेत ज्यामध्ये उपचाराची परिणामकारकता दिसते.

केस स्टडी #5

मधुमेह नसलेल्या आणि हायपरटेन्शन असलेल्या या 84 वर्षांच्या वृद्धेला पावलाच्या मागील बाजूला गेल्या तीन वर्षांपासून एक अल्सर होता जो बरा होत नव्हता. अल्ट्रासाउंड डॉपलर मूल्यमापनामध्ये रोहिणीमध्ये कोणतीही अक्षमता दिसली नाही; तथापि, पायाच्या मधल्या व खालच्या भागामध्ये अनेक अक्षम परफोरेटर होते. त्यांनी एंडोव्हेनस लेसर आणि फोम स्क्लेरोथेरपीचे एकत्रित उपचार घेतले. त्यानंतर अल्सरला दररोज प्लेरमिन मलम लावले गेले. खाली दिसत असल्यानुसार सहा आठवड्यांच्या कालावधीमध्ये अल्सर पूर्णपणे भरून आला.

केस स्टडीज

कॉपीराईट ©2018 व्हेरिकोज व्हेन्स India. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स

Drop in your contact details, and we will call you.

Testing

आम्ही कार्यरत आहोत!
सोमवार ते शुक्रवार – सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6
शनिवारी – सकाळी 9.00 ते दुपारी 4